जगभरात ज्वेलरीबाबत लोकांमध्ये नेहमीच फार क्रेझ बघायला मिळते. सोन्या-चांदीचे दागिने सर्वसामान्य लोक खरेदी करतात, पण डायमंड आणि अॅंटीक वस्तूंपासून तयार दागिने इतके महाग असतात की, त्यांना खरेदी करणे मोठ्यात मोठ्या श्रीमंतांनाही महागात पडू शकतं.
या प्रकारच्या दागिन्यांची किंमत कोट्यवधींमध्ये असते. गेल्या काही वर्षात अशाप्रकारच्या दागिन्यांची क्रेझ वाढताना दिसत आहे. हेच कारण आहे की, त्यामुळे या दागिन्यांची किंमत वाढत आहे. चला जाणून घेऊ जगातल्या ७ सर्वात महागड्या ज्वेलरीबाबत ज्यांची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हाल. या ज्वेलरीच्या किंमती त्यावेळच्या व्हॅल्यूनुसार देण्यात आल्या आहेत. कारण त्यावेळी डॉलरच्या तुलनेत रुपयांचा स्तर जास्त नव्हता.
व्हिटल्सबॅक ग्राफ डायमंड रिंग
ही रिंग ३५.५६ कॅरेटच्या डीप ब्लू डायमंडपासून तयार करण्यात आली आहे. हा डायमंड ऑस्ट्रिया आणि बोवारियन क्राउन ज्वेलरी मार्केटमध्ये पहिल्यांदा बघण्यात आला होता. त्यानंतर २००८ मध्ये लंडन ज्वेलर लॉरेन्स ग्राफने हा डायमंड २.३४ कोटी डॉलर(त्यावेळचे १५२ कोटी रुपये) मध्ये विकत घेतला. लॉरेन्स ग्राफने हा डायमंड खेरदी केल्यानंतर त्यात काही बदल केलेत. त्यानंतर हा डायमंड आणखीन जास्त सुंदर झाला आणि याची व्हॅल्यू वाढली. त्यानंतर हा डायमंड २०११ मध्ये कतारच्या रॉयल फॅमिलीने ८ कोटी डॉलरला म्हणजे त्यावेळच्या हिशोबाने ५२० कोटी रुपयांना खरेदी केला.
पिंक स्टार डायमंड रिंग
२०१३ पर्यंत ग्राफ पिंक जगातली सर्वात महागडी डायमंड रिंग होती. कारण एका लिलावात याची सर्वात जास्त बोली लागली होती. ही अंगठी ५९. ६ कॅरेटची आहे. हा डायमंड आफ्रिकेच्या खाणीतून काढण्यात आला होता. त्यावेळी हा डायमंड १३२.५ कॅरेटचा होता. पण त्याला आकार देण्यात आल्यानंतर ५९.६ कॅरेटचा शिल्लक राहिला. एका लिलावाची माहिती देणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, त्यावेळी याची किंमत ८.३ कोटी डॉलर ठेवण्यात आली होती. या डायमंडपासून तयार अंगठी बरेच दिवस इसाक वूल्फ नावाच्या व्यक्तीकडे होती. त्यानंतर सौदी अरबमध्ये आणली गेली. त्यावेळी या अंगठीची किंमत ७.२ कोटी डॉलर म्हणजेच ४६८ कोटी रुपये होती.
लिंकॉमपेरेबल डायमंड नेकलेस
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे लिंकॉमपेरेबल डायमंड नेकलेसचं येतं. हा जगातला सर्वात महागडा नेकलेस मानला जातो. हा नेकलेस ४०७.४८ कॅरेट डायमंडापासून तयार करण्यात आला आहे. हा डायमंड एका लहान मुलीला १९८० मध्ये डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये मिळाला होता. याची किंमत ५.५ कोटी डॉलर म्हणजेच ३५७.५ कोटी रुपये आहे.
द ग्राफ पिंक
२०१० मध्ये एका लिलावादरम्यान या रिंगला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला होता. याची किंमत ४ कोटी डॉलर म्हणजेच २६० कोटी रुपये ठेवण्यात आली होती. या रिंगमध्ये २४.७८ पिंक कॅरेटचा डायमंड लावण्यात आला आहे. २०१० मध्ये ग्राफ लॉरेन्सने डायमंडची किंमत २.७ ते ३.८ कोटी डॉलर ठेवली होती. त्यानंतर लिलावात याची ४.६२ कोटी डॉलर किंमत मिळाली होती.
जोए डायमंड
या डायमंडने तयार रिंग पहिल्यांदा सौदीच्या एका लिलावात पाहिली गेली होती. ही रिंग एका जोए डायमंड रिंग ब्लू डायमंडपासून तयार करण्यात आली आहे. ही रिंग एका लिलावात ठेवण्यात आली होती. लिलावाआधी एक्सपर्ट्सचं मत होतं की, याची किंमत जवळपास १.५ कोटी डॉलर इतकी मिळणार. पण सर्वाना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा लिलावात या रिंगला ३.२६ कोटी डॉलर म्हणजेच २११.९ कोटी रुपये किंमत मिळाली.
द डायमंड बिकीनी
ही ज्वेलरी फॅबरिक डायमंडपासून तयार करण्यात आली आहे. ही डायमंडची बिकीनी परिधान करुन पाण्यात जाता येतं. ही बिकीनी सुसेन रोजनने डिझाइन केली आहे. ही १५० कॅरेट डायमंडपासून तयार करण्यात आली आहे. पहिल्यांदा ही बिकीनी मोली सिलिम्स कलेक्शनमध्ये सादर करण्यात आलं होतं. याची किंमत ३ कोटी डॉलर म्हणजेच १९५ कोटी रुपये इतकी आहे.
हुटन मेडिवनी जेडिएट नेकलेस
हा डायमंड कंपनी कार्टियरचा प्रसिद्ध नेकलेस आहे. हा एका लिलावातून खरेदी करण्यात आला होता. या नेकलेसमध्ये २७ एम्बरलॅंड डायमंड लागले आहेत. तसेच यात एका सुंदप रूबीचाही वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच या नेकलेसमध्ये सोनं आणि प्लेटिनमचाही फार सुंदर वापर करण्यात आला आहे. याची किंमत २.७४ कोटी डॉलर म्हणजेच १७८.१ कोटी रुपये आहे.