Worlds most expensive salt : मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही. जवळपास सगळ्याच गोष्टींमध्ये आपण मीठ टाकतो. मीठ जर नसतं तर काय झालं असतं असाही प्रश्न अनेकांना पडत असेल. सामान्यपणे 1 किलो मीठ बाजारात 20 ते 50 रूपये किलो भावाने मिळतं. पण जगात एक असंही मीठ आहे ज्याच्या किंमतीची तुम्ही कल्पनाही केली नसेल.
जगातलं सर्वात महागडं मीठ
जगातलं सर्वात महागडं मीठ आइसलॅंडिक सॉल्ट आहे. हे मीठ फार महागडं आहे. पण तरी सुद्धा शेफ लोकांमध्ये हे मीठ फार लोकप्रिय आहे. हे मीठ केवळ 90 ग्रॅम घ्यायचं असेल तर तुम्हाला 11 डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार, 803 रूपये मोजावे लागतील. तर 1 किलो मीठ घेण्यासाठी जवळपास लाखो रूपये मोजावे लागतील.
इतकं महाग असण्याचं कारण?
हे मीठ लक्झरीपेक्षा कमी नाही आणि याचा शोधही काही वर्षाआधीच लागला. आइसलॅंडिक सॉल्टला आइसलॅंडच्या उत्तर-पश्चिम भागात हातांनी तयार केलं जातं. हे मीठ आइसलॅंडमधील वेस्टफ्योर्ड्समधील सॉल्टवर्कच्या फॅक्टरीमध्ये तयार केलं जातं. हे ठिकाण डोंगरात आहे आणि वर्षातले अनेक दिवस बर्फवृष्टीमुळे बंद राहतं. एक रोड टनल तयार झाल्यावर 1996 येथील स्थिती सुधारली होती. या ठिकाणी दरवर्षी 10 मेट्रिक टन मिठाचं उत्पादन केलं जातं. अनेक आठवड्यांच्या मेहनतीनंतर हे मीठ तयार होतं. इथे सगळं काम हाताने केलं जातं.
कसं तयार होतं ?
समुद्राचं पाणी मीठ तयार करण्याच्या फॅक्टरीमध्ये आणलं जातं. त्यानंतर एका मोठ्या बिल्डींगमध्ये ते पाइपद्वारे पाठवलं जातं. तिथे अनेक पूल बनवलेले आहे आणि प्रत्येक पूलमध्ये रेडीएटर्स असतात. या रेडीएटर्सच्या मदतीने पाणी वाहतं आणि पाणी गरम होतं. जसजसं पाणी वाफ होऊन उडतं, तसतसं मीठ एका जागी जमा होऊ लागतं. टॅंक्सपासून ते पॅन आणि ड्रॉइंग रूमपर्यंत सर्व गरम पाण्याने भरलेलं असतं. आइसलॅंड सॉल्ट हलक्या हिरव्या रंगाचं असतं.