जगातील एकापेक्षा एक श्रीमंत लोकांबाबत आपण ऐकलं असेल. असाच एक सुलतान आहे, ज्याच्याकडे जवळपास ७ हजार लक्झरी कार्स आहेत. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस (Rolls Royce), मर्सिडीज (Mercedes), फरारी (Ferrari), बेंटले (Bentley) यासह अनेक लक्झरी वाहनांचा समावेश आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की बसण्यासाठीही सोन्याच्या सिंहासनाचा वापर केला जातो. इतकंच नाही, तर त्यांची गाडीदेखील सोन्यानं मढलेली असते. तर मग जाणून घेऊया कोण आहे या ७ हजार कार्सचा मालक.
७ हजार कार्ससह अमाप संपत्तीच्या मालकाचे नाव हसनल बोलकिया (Hassanal Bolkiah) असे आहे. ते ब्रुनईचा (बोर्निओ बेटावरील एक छोटासा देश) विद्यमान सुलतान आणि पंतप्रधान आहेत. जगातील श्रीमंत राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. हसनल बोलकिया यांनी ब्रुनेईवर राज्य केल्यापासून ५० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. १९८० पर्यंत हसनल हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.
कार कलेक्शन आणि प्लेनअनेक रिपोर्ट्सनुसार त्यांच्या कार कलेक्शनमध्ये ७ हजार कार्स आहेत. यामध्ये ६०० पेक्षा अधिक रोल्स रॉयस, ५७० पेक्षा अधिक मर्सिडीज बेंझ आणि अन्य लक्झरी कार्स आहेत. त्यांच्याकडे एक अशीही कार आहे, जी पूर्णपणे सोन्यानं मढवलेली आहे. अनेकगा ती कार रस्त्यांवरही दिसून येते.
त्यांचा हा पॅलेस १९८४ मध्ये तयार करण्यात आला असून तो २ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेला आहे. यामध्ये २२ कॅरेट सोन्याचाही वापर करण्यात आला आहे. यात १७०० पेक्षा अधिक खोल्या, २५७ बाथरुम, पाच स्विमिंग पूल, ११० गॅरेज आणि २०० घोड्यांसाठी एसी जागाही आहे.