बैरुत : तुम्हाला जगातील सगळ्यात पातळ इमारत माहितेय? आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की इमारत कशी काय पातळ असू शकते? पण हे खरं आहे. या जगात पातळ इमारतही अस्तित्वात आहे. लेबनॉन या देशाची राजधानी असलेला बैरुतमध्ये ही इमारत बांधण्यात आलेली आहे. ही इमारत बांधण्यामागेही तसंच महत्त्वाचं कारणही आहे.
वडिलोपार्जित संपत्तीवरुन सगळीकडेच भांडणं होत असतात. कधीकधी ही भांडणं इतकी टोकाला जातात की एकमेकांचा जीवही घेतला जातो. लहानपणापासून ज्या व्यक्तींसोबत आपण राहिलो त्यांच्याच जीवावर आपण उठतो. पण बैरुतमध्ये एका भावाने एक वेगळीच शक्कल लढवली. भावाने ज्याठिकाणी बंगला बांधला त्याच्या बाजूलाच दुसर्या भावाने ही पातळ इमारत बांधली आहे. भावाच्या बंगल्याच्या शेजारी भूमध्य समुद्राचा सुंदर नयनम्य दृष्य दिसत होतं. त्यामुळे त्याच्या घराला एक वेगळीच शोभा आली होती. त्यामुळे या भावाला तोडीस तोड म्हणून दुसर्या भावानेही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. त्याने शक्कल लढवून नेमकी समुद्राच्या ठिकाणी इमारत बांधली आणि ही इमारत अशाप्रकारे बांधली की दुसर्या भावाच्या इमारतीतून हा समुद्रच दिसला नाही पाहिजे.
खरं तर ही कहानी फार जुनी आहे. या भावांचा वाद फार जुना असून ही पातळ इमारत 1954 सालीच बांधण्यात आली होती. सुरुवातीला या इमारतीचा रंग पिवळा होता, आता इमारतीची पुन्हा दुरुस्ती केली असून त्याचा रंग गुलाबी करण्यात आला आहे. या इमारतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही इमारत एका बाजूने रुंद आणि एका बाजूने अरुंद आहे. अल बासा असं या इमारतीचं नाव असून क्वीन शीप म्हणूनही ओळखलं जातं. 1975 ते 1990 च्या झालेल्या युद्धात ही इमारत स्त्रियांच्या शरीरविक्रीसाठीही वापरली जायची. या इमारतीच्या जागेवर नवं बांधकाम करण्यात येऊ शकत नसल्याचंही समोर येत आहे. एखाद्या इमारतीसाठी जेवढी जागा लागते त्यापेक्षी ही जागा फार कमी असल्याने या इमारतीच्या जागेवर नवं बांधकाम करण्यास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.
सौजन्य- www.the961.com