जगातील सर्वात उंच व्यक्ती (Tallest man in the world) रशियात (Russia) पोहोचला आहे. तो इथे नव्या पत्नीच्या शोधात आला. जिच्यासोबत मिळून तो बाळाला जन्म देऊ शकेल. ३९ वर्षीय सुल्तान कोसेन (sultan kosen) तुर्कीतील एक शेतकरी आहे. त्याचा ट्यूमर त्याच्या पिट्यूटरी ग्रंथींना प्रभावित करत आहे. त्यामुळे त्याचा आकार सामान्यापेक्षा जास्त आहे. जेव्हा पिट्यूटरी ग्रंथ फार जास्त हार्मोन्स रिलीज करतात तेव्हा असं होतं.
आपल्या आश्चर्यकारक उंचीमुळे त्याचं नाव ८ फूट ३ इंच उंचीसोबत सर्वात उंच जिवंत व्यक्तीच्या रूपात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे. कोसेन म्हणाला की, आता त्याला या उंचीची सवय झाली आहे. पण कधी कधी यामुळे अनेक अडचणींचा आणि असुविधांचा सामना करावा लागत होता. त्याने २०१३ मध्ये २९ वर्षीय मर्व डिबो नावाच्या ५ फूट ९ इंच उंचीच्या महिलेसोबत लग्न केलं होतं. ती सीरियाची होती.
घटस्फोटानंतर पुन्हा लग्नाचा विचार
एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, त्याची त्याच्या पत्नीसोबत सर्वात मोठी अडचण होती कम्युनिकेशन. कारण तो तुर्की बोलतो आणि त्याच्या पत्नीला केवळ अरबी येत होती. संभाषणात समस्या असूनही दोघांनी अनेक वर्ष संसार केला. त्यांनी नुकताच घटस्फोट घेतला. आता एकटं राहण्यापेक्षा कोसेनने पुन्हा लग्नाचा विचार केला आहे. तो डिसेंबरच्या सुरूवातीला रशियात पोहोचला. तिथे तो त्याच्यासाठी पत्नी शोधत आहे.
रशियातील महिलांना कसे पुरूष आवडतात?
डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार तो म्हणाला की, 'मी माझ्या नव्या पत्नीला माझ्यासोबत तुर्कीला घेऊन जायचं आहे. मी समुद्रापासून दूर एका ऐतिहासिक ठिकाणी राहतो. मी ऐकलंय की, रशियातील महिलांना विनम्र पुरूष जास्त पसंत आहेत. मग तर हे फार सोपं होईल'. कोसेन म्हणाला की, रशियन महिला नेहमी आपल्या पतीवर प्रेम करेल.