तुम्ही ऐकलं असेलच की, काही चोर हे डोळ्यातील काजळही चोरून नेतात, पण समोरच्याला खबरही लागत नाही. जगात काही चोर असे झाले आहेत ज्यांनी सर्वांनाच हैराण केलं जगभरातील एजन्सीज आजपर्यंत या चोरांना पकडू शकलेल्या नाहीत. असेच तीन चोर सध्या जगात आहेत.
नंबर ३ - डीबी कूपर
जगातला तिसरा सर्वात हुशार चोर डीबी कूपर मानला जातो. डीबी कूपर (DB Cooper) ने २४ नोव्हेंबर १९७१ ला बोइंग - ७०७ विमान हायजॅक केलं होतं. डीबी कूपर एक बॉम्ब घेऊन विमानात चढला होता. सर्वातआधी त्याने एका एअरहोस्टेसला सांगितलं की, त्याच्याकडे बॉम्ब आहे. त्यानंतर त्याने एक नोट प्लेनच्य पायलटला पाठवली. ज्यात लिहिलं होतं की, पॅराशूट आणि २ लाख डॉलर द्या नाही तर प्लेन बॉम्बने उडवणार. विमान अमेरिकेतील Seattle मध्ये लॅंड करा आणि तिथे मला हे सगळं पाहिजे. Seattle मध्ये त्याने त्याच्या मागणीच्या बदल्यात ३६ प्रवाशांना विमानात उतरून दिलं होतं. त्यानंतर प्लेन मेक्सिकोसाठी उडवलं आणि डीबी कूपरने पराशूटच्या मदतीने मधेच प्लेनमधून उडी घेतली. आजपर्यंत पोलीस त्याला शोधू शकले नाहीत. एफबीआय आजही त्याचा शोध घेत आहे.
दुसरा सर्वात हुशार चोर
दुसऱ्या नंबरचा सर्वात खतरनाक चोरांमध्ये अमेरिकेतील बोस्टनमध्ये गार्डनर म्युझिअममध्ये चोरी करणारे दोन चोर आहेत. १९९० मध्ये दोन चोर गार्डनर म्युझिअममध्ये पोलीस बनून शिरले होते. ते गार्डला म्हणाले की, चेकिंग करण्यासाठी आले. त्यानंतर गार्ड्सना बांधून त्यांनी अब्जो रूपयांचे १३ आर्ट वर्क चोरी केले होते. ३१ वर्षानंतरही ते आर्ट वर्क सापडले नाहीत. FBI या चोरांचा शोध घेत आहेत. म्युझिअमने चोरांवर १० मिलियन डॉलर म्हणजे साधारण ७५ कोटी ६१ लाख ३१ हजार ५०० रूपये बक्षीस ठेवलं आहे.
सर्वात खतरनाक चोर
सर्वात खतरनाक चोर म्हणून हॅरी विंस्टन रॉबरीचा आरोपी आहे. डिसेंबर २००८ ला फ्रान्सच्या पॅरिसमध्ये तीन महिला आणि एक पुरूष ज्वेलरी शॉपमध्ये शिरले. मग एका मुलीने बॅगमधून बंदूक काढली आणि दुसरीने हॅं ग्रेनेड दाखवून सर्वांना घाबरवलं. या लोकांनी ज्वेलरी शॉपमधून १०८ मिलियन डॉलरची चोरी केली. पण आजपर्यंत या चोरांना कुठेही पत्ता लागला नाही.