बिहारमधील नालंद जिल्ह्यातून एक विचित्र प्रेमकथा (Weird Love Story) समोर आली आहे. एका महिलेच्या पतीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. यानंतर ती आईसोबत भाड्याच्या घरात राहू लागली. तिला ३ मुलेदेखील आहेत. अचानक एके दिवशी तिला एका राँग नंबरवरून फोन आला आणि पुढे दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. या संवादाचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे दोघांनाही कळालं नाही. दोघांनी सोबत राहायचं ठरवलं आणि प्रियकर आपल्या प्रेयसीला घेऊन गेला (Love Story Started with a Call on Wrong Number). आता महिलेचा असा आरोप आहे, की एक वर्ष सोबत राहिल्यानंतर आता तिच्या प्रियकराने तिला सोडून दिलं आहे. महिला आता पोलिसांकडे आपला प्रियकर आपल्याला परत मिळवून देण्याची मागणी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नालंदा जिल्ह्यातील बिहार पोलीस स्टेशन परिसरातील डॉक्टर कॉलनीतील आहे. महिला डॉक्टर कॉलनीजवळ आपल्या दोन मुलांसह बसून आपल्या प्रियकराला परत बोलावण्यासाठी सर्वसामान्यांनाही विनवणी करत आहे. या घटनेबाबत अस्थावा येथील रहिवासी गुडिया देवीने सांगितलं की, १ वर्षापूर्वी मालती गावातील रहिवासी सुनील यादव तिच्या भांगात कुंकू भरून तिला पानिपतला घेऊन गेला होता.
वर्षभर तिथे राहिल्यानंतर, आता घरूनच काम करून कमाई करू, असं सांगत तो एका आठवड्यापूर्वी तिला परत पाटणा येथे घेऊन आला. महिलेचा असा आरोप आहे, की पाटणा येथे आल्यावर ड्रायव्हिंग लायसन्स घेण्यासाठी जात असल्याचं सांगून तो फरार झाला. एक आठवडा ती आपल्या दोन मुलांसोबत पाटणा स्टेशनवर बसून त्याची वाट बघत राहिली. मात्र तो आला नाही.
यानंतर महिलेने शहर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. अस्थावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाब असल्याने स्थानकप्रमुखांनी महिलेला तिथे जाण्याचा सल्ला दिला. महिलेनं सांगितलं की, तिच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर सासरच्या लोकांनी तिला घरातून हाकलून दिलं होतं, त्यानंतर ती आपल्या आईसोबत मुलांसह अस्थावा येथे भाड्याच्या घरात राहू लागली. दरम्यान, वर्षभरापूर्वी राँग नंबरवरून फोन आला आणि तिचं सुनीलशी बोलणं सुरू झालं.
बोलणं सुरू असतानाच दोघांचा एकमेकांवर प्रेम ज़डलं. महिलेनं सांगितलं की, एके दिवशी सुनीलने तिच्या भांगात कुंकू भरलं आणि तिच्या दोन मुलांसह तिला घेऊन पानिपतला गेला. महिलेला तीन मुले आहेत. मोठी मुलगी १२ वर्षांची, तर ८ वर्षांचा मुलगा ऋषभ आणि सूर्यांश ५ वर्षांचा आहे. आता महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता ती ना तिच्या माहेरच्या घरी जाऊ शकते ना सासरच्या घरी.