WWE च्या विश्वात असे अनेक रेसलर आहेत जे मोठ्या मुश्किलीने रिंगमध्ये सहजासहजी मात खात नव्हते. रिंगमध्ये प्रत्येक रेसलर एक स्वप्न घेऊन येतो. त्यानुसार तो मारतो आणि मार खातो. अशात एक असाही रेसलर आहे जो कित्येक वर्ष हरलाच नाही. तो म्हणजे सात फूट चार इंच उंच आंद्रे द जायन्ट.
आंद्रेचे किस्से रिंगपेक्षा बारमध्ये अधिक रंगले होते. आंद्रेला ग्रेटेस्ट ड्रंकर ऑन अर्थ म्हटलं जात होतं. त्याचे असे अनेक किस्से आहेत जे वाचून तुम्ही थक्क व्हाल. आंद्रेच्या नावावर सर्वात जास्त दारू पिण्याचा अनधिकत रेकॉर्ड आहे. असे सांगितले जाते की, एकाचवेळी तो 159 बीअर प्यायला होता.
आंद्रेने जेव्हा 156 बीअर म्हणजे 73 लिटर दारू प्यायली तेव्हा तो बेशुद्ध झाला होता. आंद्रेने सामान्य माणसापेक्षा 55 टक्के अधिक दारू प्यायली होती. त्यानंतर बारच्या मालकाने पोलिसांची किटकिट नको म्हणून आंद्रेला तसंच राहू दिलं. आंद्रे शुद्धीवर आल्यावर तो घरी गेला.
एका आजारामुळे झाला रेसलर
आंद्रे एका आजारामुळे रेसलर झाला होता. मनुष्याच्या शरीरात मानेच्या मागे पिट्यूट्री ग्लॅंड असते. यातून निघणाऱ्या हार्मोन्समुळे व्यक्तीची उंची ठरते. एकावेळानंतर ग्रंथी हार्मोन्स तयार करणं बंद करतात. त्यानंतर शरीराचा विकास थांबतो. पण आंद्रेसोबत असं नव्हतं. त्याच्यातील या ग्रंथीचं काम थांबलंच नाही आणि त्याचं शरीर भव्य झालं. या शरीरासोबतच तो शेतकऱ्याचा रेसलर झाला.
आंद्रेचा आजार वाढतंच गेला होता. बघता बघता त्याचं शरीर 300 किलोचं झालं होतं. जानेवारी 1993 मध्ये वयाच्या 46 व्या वर्षी आंद्रेचं हार्ट अटॅकने निधन झालं होतं. 1946 मध्ये फ्रान्समध्ये जन्माला आलेल्या आंद्रेने 1973 मध्ये रेसलिंगमध्ये हात आजमावला होता. 15 वर्ष सतत विजयी राहिल्यावर WWE चा दिग्गज हल्क होगनने आंद्रेचा विजयी रथ थांबवला होता. आंद्रेने करिअरमध्ये एकूण 191 फाइट लढल्या होत्या.