रशियातील याकुटीया हा जगातला सगळ्यात थंड परिसर आहे. या ठिकाणी फक्त ३ तास सूर्य उगवतो. पुर्वोत्तर रुसच्या साखा याकुटीया या ठिकाणी जगातला सगळ्यात थंड वातावरणात राहणारे लोकं आहेत. या ठिकाणी एक गाव ओम्यकॉन आहे. सैबेरीयाच्या भाषेप्रमाणे असलेले ओम्यकॉन म्हणजे असं पाणी ज्याचं कधीही बर्फात रुपांतर होत नाही. या ठिकाणी थंडीच्या वातावरणात फक्त ३ तास सुर्य उगवतो. तर उन्हाळ्याच्या दिवसात सूर्य २१ तास असतो. या ठिकाणचे रहीवासी असलेले लहान मुलं कितीही थंडीचा सामना करावा लागला तरी शाळेत जातात.
(Image credit- daily sabah)
जेव्हा तापमान -५२ डीग्रीच्या खाली जाते त्यावेळी शाळांना सुट्टी दिली जाते. सध्याच्या काळात या ठिकाणचे वातावरण -४४ डीग्री इतके आहे. याकुटीयाची एकूण लोकसंख्या ३ लाख इतकी आहे. या ठिकाणी पोस्ट ऑफिस, बॅंक आणि हॉस्पीटल सुद्धा आहेत.
या ठिकाणी आवश्यक असलेल्या सगळ्या सोयीसुविधा आहेत. जर या ठिकाणी खूप बर्फ जमा झाला तर तो खोदण्यासाठी तसंच जमीन पूर्वरत करण्यासाठी अनेक महिने लागतात. हे ठिकाण मॉस्को पासून ३ हजार ३०० मैल अंतरावर आहे.
असं असून सुध्दा हे शहर सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बर्फ पडतो म्हणून या ठिकाणचे कलाकार बर्फाचे पुतळे तयार करतात. मास्कोपासून येथे जाण्यासाठी २ दिवस लागतात. याकुटीयामध्ये कारमध्ये असलेल्या इंधनाचा बर्फ तयार होणे ही सामान्य बाब आहे. या ठिकाणी जागोजागी गॅजेट्स तयार करण्यात आले आहेत.
या ठिकाणी जनावरांच्या चामडीपासून कपडे तयार केले जातात. तसंच मुख्यतः हरणाच्या चामडीपासून कपडे तयार केले जातात. याकुटीया हे गॅस, सोनं आणि कोळश्याच्या साठ्यांकरीता प्रसिध्द आहे.