भारतातील काळा ताजमहाल पाहिला का? याच्याशी आहे आग्र्यातील ताजमहालचं कनेक्शन....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 10:51 AM2021-04-01T10:51:09+5:302021-04-01T11:03:38+5:30
ताजमहाल कसा बांधला, कधी बांधला, किती लोकांनी बांधला यावर नेहमीच चर्चा होत असते. पण त्याची आयडिया कुठून आली यावर फार कुणी बोलत नाही.
(Image Credit : tripadvisor.in)
अहिल्यानगरी इंदुरपासून जवळपास १८० किलोमीटर दक्षिणमध्ये बुरहानपूर हे शहर आहे. बुरहानपूर हे शहर आपल्या चलेबीसाठी भारतभर लोकप्रिय आहे. पण हे शहर केवल मिठाईसाठीच लोकप्रिय नाही. आग्र्यातील प्रसिद्ध संगमरमरचा मकबरा ताजमहालला जगात प्रेमाची निशाणी मानलं जातं. याची सुंदरता आजही लोकांना मोहित करते.
ताजमहाल कसा बांधला, कधी बांधला, किती लोकांनी बांधला यावर नेहमीच चर्चा होत असते. पण त्याची आयडिया कुठून आली यावर फार कुणी बोलत नाही. असा दावा केला जातो की, ताजमहालची आयडिया मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमधून घेतली गेली. आग्र्याचा ताजमहाल आणि काळा ताजमहालची बनावट मिळती-जुळती आहे. पण याचा कोणताही ठोस पुरावा मिळत नाही की, शाहजहांने याच मकबऱ्याहून ताजमहाल बनवण्याची आयडिया घेतली.
काळा ताजमहाल
आग्र्यातील ताजमहाल हा शाहजहांने त्याची पत्नी मुमताजच्या आठवणीत बांधला होता. आर्किटेक्टरच्या दृष्टीने हा उत्कृष्ट मकबरा आहे. असे म्हटले जाते की, शाहजहांला मध्य प्रदेशच्या बुरहानपुर येतील काळा ताजमहाल पाहूनच आग्र्यात संगमरमरचा ताजमहाल बांधण्याची आयडिया आली.
दरम्यान बुरहानपूर येथील काळ्या ताजमहालाबाबत माहिती तशी कमीच लोकांना आहे. अनेक वर्षांपासून वातावरणाचा मार, पशु-पक्ष्यांचा गोंधळ आणि सरकारचं दुर्लंक्ष सहन सहन केल्यावर २०१९ मध्ये भारतीय पुरातत्व आणि सर्व्हेक्षण विभागाने याची काळजी घेणं सुरू केलं. आज हा काळा ताजमहाल आकर्षण ठरतो आहे.
शाहनवाज खानचा मकबरा
इतिहासकारांनुसार, काळा ताजमहाल शाहनवाज खानचा मकबरा आहे. अब्दुल रहीम खानखानाचा मोठा मुलगा होता शाहनवाज खान. बुरहानपूरमध्ये जन्माला आलेल्या खानच्या बहादुरीचे आणि शौर्याचे किस्से प्रसिद्ध आहे. त्यानेच त्याला मुघल फौजेचा सेनापती केलं होतं. शाहनवाज खान आणि त्याच्या पत्नीला जिथे दफन करण्यात आलं तिथेच काळा ताजमहाल बनवला आहे.
The Hindu मधील एका लेखानुसार, काळ्या दगडापासून तयार केलेल्या या मकबऱ्याला काळाने आणखीन काळं केलं आहे. मकबऱ्याला जवळून पाहिल्यावर लक्षात येतं की, एके काळी हा किती सुंदर असेल.
बुरहापूरमध्येच शाहजहांची दुसरी पत्नी मुमताजने अखेरचा श्वास घेतला होता आणि इथेच तिचा मकबरा तयार केला जाणार होता. मुमताजने इथेच आपल्या १४व्या बाळाला जन्म देऊन अखेरचा श्वास घेतला होता. बुरहानपूरच्या मातीत जास्ती कीटक, वाळवी असल्याने ताजमहाल आग्र्याला बांधण्यात आला. बुरहानपूरचा काळा ताजमहाल आज धुळ खात आहे आणि फार लोकप्रिय होऊ शकला नाही जेवढ्या इतर मुघलकालीन इमारती झाल्या.