मुकेश अंबानी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांचा उल्लेख होताच डोळ्यांसमोर पैसाच पैसा येतो. दिवसेंदिवस त्यांचा बिझनेस वाढत आहे आणि त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ होत आहे. दररोज त्यांचे नवे बिझनेस सुरू होत आहे. त्यांची संपत्ती इतकी वाढली आहे की, आपण केवळ विचार करून चक्रावून जाऊ. काही सेकंदात ते लाखो रूपये कमावतात. आता ज्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे, त्यांच्या सुरक्षेची व्यवस्थाही मजबूत असली पाहिजे. तशीच मुकेश अंबानी यांची सुरक्षा मजबूत आहे.
कोण करतं मुकेश अंबानी यांची सुरक्षा?
दररोज यशाची नवे शिखर गाठणारे मुकेश अंबानी यांनी यशाचा नवा इतिहास रचला आहे. त्यांना २०१३ पासून Z प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. Z प्लस सुरक्षा प्रत्येकाला मिळत नाही. देशात केवळ १७ लोक असे आहेत ज्यांना Z प्लस सिक्युरिटी दिली जाते. यात देशाच्या पंतप्रधानाचा समावेश आहे.
Z Plus सुरक्षा का?
२०१३ मध्ये मुकेश अंबानी यांना मुजाहिद्दीन संघटनेकडून धमकी मिळाल्यानंतर भारत सरकारने त्यांना Z Plus सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. ७ वर्षापासून मुकेश अंबानी यांना Z Plus सुरक्षा दिली आहे.
किती येतो खर्च?
gqindia.com च्या वृत्तानुसार, Z Plus सुरक्षेत साधार ५५ पर्सनल सिक्युरिटी गार्ड्स असतात. ५५ मध्ये जवळपास १० एलीट लेव्हलचे राष्ट्रीय सिक्युरिटी गार्ड्स सहभागी असतात. जे दिवस-रात्र मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत तैनात असतात. Z Plus सुरक्षेचा दर महिन्याचा खर्च १५-१६ लाख रूपये येतो. सिक्युरिटी गार्ड्सची सॅलरी मुकेश अंबानी सरकारला देतात. त्यासोबतच या गार्ड्सना किचन आणि टॉयलेटची सुविधा दिली जाते.