(Image Credit : unsplash.com)
आजकाल तर गरिब असो वा श्रीमंत सगळ्यांकडे मोबाईल असतात. पण २० वर्षांआधी ही स्थिती फारच वेगळी होती. ९०च्या दशकात कुणाच्या हातात मोबाईल दिसला तर त्याला हायफाय मानलं जायचं. कारण त्यावेळी हजारोंमधील काही मोजक्याच लोकांकडे मोबाईल असायचे. पण भारतात सर्वात पहिला मोबाईल कुणी वापरला होता? याचं उत्तर अनेकांकडे नसेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला याचं उत्तर देणार आहोत.
३१ जुलै १९९५ चा तो ऐतिहासिक दिवस होता. या दिवशी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी कोलकातातील रायटर्स बिल्डींगमधून दिल्लीतील संचार भवनमध्ये असलेले केंद्रीय संचार मंत्री सुखराम यांना देशातील पहिला मोबाईल कॉल केला होता. यादरम्यान ज्योति बसू यांनी कॉल करण्यासाठी नोकिया २११० हा हॅंडसेट वापरला होता.
(Image Credit : news18.com)
'मोदी टेल्स्ट्रा' भारतात मोबाईल सेवा सुरू करणारी पहिली कंपनी होती. या सर्व्हिसचं नाव मोबाईल नेट असं ठेवण्यात आलं होतं. या सर्व्हिसला लोकांपर्यत पोहचवण्यासाठी नोकिया हॅंडसेटटी मदत घेतली गेली. 'मोदी टेल्स्ट्रा' नंतर स्पाइस टेलिकॉम ही कंपनी सेवा देऊ लागली.
कोलकाताला देशातील पहिली मोबाईल नेटवर्क सिटी करण्यासाठी ज्योति बसू आणि 'मोदी टेल्स्ट्रा' चे चेअरमन बी.के.मोदी यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतर यावर काम सुरू झालं. साधारण १० महिन्यांनंतर मोदी टेस्ल्ट्राचे चेअरमन बी.के.मोदी पुन्हा एकदा पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी भेटण्यास गेले. यावेळी मोदी पूर्ण तयारीसोबत आले होते. यावेळी भारतात आधी कधीच झालं नाही ते झालं. देशातील पहिला मोबाईक कॉल यावेळी करण्यात आला.