(Image Credit : discoverwildlife.com)
जगात वेगवेगळ्या प्रकारचे जीव आढळतात ज्यातील काही फारच दुर्मीळ असतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा जीवाबाबत सांगणार आहोत ज्याबाबत वाचल्यावर तुम्ही हैराण व्हाल. बऱ्याच लोकांना प्राणी पाळण्याची आवड असते, ज्यासाठी ते खूपसारा पैसाही खर्च करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक असा कीटक (beetle stag) आहे जो पाळण्यासाठी लोक लाखो रूपये खर्च करतात.
पृथ्वीवर एक असा दुर्मीळ कीटक आहे ज्याला विकत घेण्यासाठी लोक लाखो रूपये खर्च करतात. या दुर्मीळ कीटकाची किंमत (Most expensive insect) इतकी आहे की, तुम्ही तेवढ्यात एक घर खरेदी करू शकाल. एकीकडे काही लोक कीटकांना घाबरतात त्यांना दूर करतात, तर दुसरीकडे हा कीटक खरेदी करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. पण असं काय आहे या कीटकात की, लोक त्याच्यासाठी लाखो रूपये खर्च करतात?
लोक या कीटकाला खरेदी करण्यासाठी धडपडतात कारण हा कीटक कोणत्याही व्यक्तीला रातोरात कोट्याधीश बनवू शकतो. हा मूल्यवान कीटक जगात स्टॅग बीटल नावाने ओळखला जातो. या कीटकाचा आकार दोन ते तीन इंचाचा असतो. असं मानलं जातं की, पृथ्वीवरील सर्वात छोट्या, विचित्र आणि दुर्मीळ प्रजातींपैकी स्टॅग बीटल एक आहे.
असंही म्हटलं जातं की, लोक एक कोटी रूपये देऊनही या कीटकाला खरेदी करण्यासाठी तयार असतात. स्टॅग बीटल हा एक लुकानिडे प्रजातीचा कीटक आहे. तो दुर्मीळ असल्या कारणाने इतका महाग असतो. या कीटकाला तुम्ही त्याच्या डोक्यावर निघालेल्या शिंगानी ओळखू शकता. २ ते ४.८ इंच दरम्यान या कीटकाचा सरासरी आकार असतो. काही वर्षाआधी एका जपानी ब्रीडरने आपल्या स्टॅग बीटलला साधारण ६५ लाख रूपयांना विकलं होतं. काही दाव्यांनुसार, या कीटकापासून अनेक औषधं तयार केली जातात.
हा कीटक सामान्यपणे उष्ण ठिकाणांवर आढळतो. हिवाळ्यात या कीटकांचा मृत्यू होता. हिवाळ्यात खत किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली उष्ण ठिकाणीच ते जिवंत राहू शकतात. स्टॅग बीटल साधारण सात वर्ष जिवंत राहतात. आता तर जगभरात या कीटकाची तस्करीही केली जात आहे. भारतातही याचं प्रमाण वाढलं आहे.