चंदिगड - माणसाचा अंतकाल जवळ आल्यावर त्याचे प्राण नेण्यासाठी दोन यमदूत येतात, असे शास्त्र सांगते. पण या यमदूतांनी कधी कुणाचे चुकून प्राण नेल्याचे तुम्ही ऐकलेय का? पण पंजाबमधील एका गावामध्ये असा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथील एका तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. दु:खद प्रसंगी त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारांची तयारी सुरू केली. मात्र अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच हा तरुण उठून बसला. दरम्यान, यमदूतांनी चुकून आपले प्राण नेल्याचा दावा या तरुणाने केला आहे. हा प्रकार पंजाबमधील बरनालाजवळील पक्खोकला गावात घडला आहे. येथील सिंगारा सिंह यांचा मुलगा गुरतेज सिंह याला अंधूक दिसू लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारांसाठी त्याला चंदिगडमधील पीजीआय येथे दाखल करण्यात आले. तेथे 11 जानेवारी रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र त्याचे डेथ सर्टिफिकेट त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आले नाही. कुटुंबीयांनी गुरतेग याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. अंत्यसंस्कारासाठी त्याचे कपडे बदलत असताना शेजाऱ्यांना त्याचे श्वसन सुरू असल्याचे जाणवले. त्यामुळे शेजारच्या केमिस्ट शॉपमध्ये काम करणाऱ्याला बोलावले गेले. त्याने गुरतेजचा श्वासोश्वास सुरू असल्याचे सांगितले. त्यादरम्यान गुरतेग उठून बसला. त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला सिव्हील रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी गुरुतेज याला फरीदकोट येथील बाबा फरीद मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, या प्रकारामुळे गुरतेजच्या कुटुंबीयांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जिवंत झाला तरुण; म्हणाला, यमदुतांनी चुकून नेले होते प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 4:24 PM
माणसाचा अंतकाल जवळ आल्यावर त्याचे प्राण नेण्यासाठी दोन यमदूत येतात, असे शास्त्र सांगते. पण या यमदूतांनी कधी कुणाचे चुकून प्राण नेल्याचे तुम्ही ऐकलेय का?
ठळक मुद्देपंजाबमधील एका गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहेपंजाबमधील बरनालाजवळील पक्खोकला गावातील एका तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले होतेमात्र अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच हा तरुण उठून बसला