दुर्दैवी! अनलॉकनंतर परतलेल्या गर्लफ्रेंडला होस्टेलवर भेटायला गेला होता डॉक्टर, पाईपवरून घसरून गमवावा लागला जीव...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 01:55 PM2020-06-15T13:55:58+5:302020-06-15T13:55:58+5:30
काहीजण लॉकडाऊनमध्येही काहीही करून आपल्या प्रिय व्यक्तीला भेटायला गेले. असंच एका तरूणाला प्रेयसीला काहीही करून भेटणं जीवावर बेतलंय.
लॉकडाऊनमुळे लोकांचं एकमेकांना भेटणं बंद झालं. सर्वांसोबतच याचा फटका बसला तो प्रेमी युगुलांना. प्रेमी युगुल कित्येक दिवस भेटूच न शकल्याने किंवा ज्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याला बघू न शकल्याने कावरेबावरे झाले आहेत. त्यामुळे काहीजण अशातही काहीही करून प्रिय व्यक्तीला भेटत आहे. असंच एका तरूणाला प्रेयसीला काहीही करून भेटणं जीवावर बेतलंय.
मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. येथील एका प्रतिभावंत डॉक्टरला फार कमी वयातच एका अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. हा डॉक्टर असलेला तरूण त्याच्या गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी लपून-झपून तिच्या हॉस्टेलवर गेला होता. बराच वेळ दोघे सोबत होते, त्यानंतर तिला भेटून परतताना पाईपवरून त्याला पाय घसरला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण त्याचा जीव वाचू शकला नाही.
ही संपूर्ण घटना घडली इंदोरच्या इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये. येथील एक तरूण डॉक्टर गर्लफ्रेन्डला भेटून परत येताना पाईपवरून घसरून खाली पडला. तो गर्ल्स हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरील पाईपने खाली येत होता. दरम्यान त्याचा पाय घसरला. त्याला लगेच इंदोरमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या तरूणाचं नाव आहे आयुष आणि त्याची गर्लफ्रेन्ड सोबत एमबीबीएस करत होते. आयुष हा इंडेक्स हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होता. लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यावर त्याची गर्लफ्रेन्ड बऱ्याच महिन्यांनी घरून इंदोरला परतली होती. तिला भेटण्यासाठी तो हॉस्टेलवर गेला होता.
स्थानिक एसपी सूरज वर्मा यांनी सांगितले की, इंडेक्स मेडिकल कॉलेजचे डॉक्टर आयुष यांचां मृत्यु झालाय. पुढील तपास सुरू आहे.
Lockdown: हेच ऐकायचं बाकी होतं! कोरोनामुळे लग्न रद्द झालं तरी ‘या’ कपल्सची हनीमूनला जाण्याची तयारी
भारतीयांचा जुगाड! आता लग्नात नातेवाईकांच्या शिफ्ट्स; प्रत्येकासाठी वेळ फिक्स