एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. कुठी हत्या तर कुठे मारहाणीच्याही घटना घडतात. अशीच एक एका जोडप्याची विचित्र घटना समोर आली आहे. बिहारच्या वीरपूर पोलीस स्टेशन भागातील तुरकैजनी गावातील ही घटना असून येथे गावकऱ्यांनी प्रेमी जोडप्याला रात्रभर झाडाला बांधून ठेवलं आणि सकाळी दोघांचं लग्न लावून दिलं. आश्चर्याची बाब म्हणजे महिला आधीच विवाहित आहे.
रविवारी रात्री ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, रात्री एक तरूण तुरकैजनी गावातील त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. महिलेच्या घरी पती नसल्याची संधी बघताच तो तिला भेटायला आला होता. तो गावातील लोकांच्या नजरा चुकवत प्रेयसीच्या घरात शिरला. (हे पण वाचा : अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनंच काढला काटा; दोन बायका असलेल्या पतीची हत्या)
मात्र, त्यानंतर जे होणार होतं त्याचा त्याला अजिबात अंदाज नव्हता. गावातील काही लोकांना हे समजलं होतं की, एक तरूण महिलेला भेटण्यासाठी आला असून तिच्या घरात शिरला आहे. गावकऱ्यांनी उशीर न करता महिलेच्या घरी धाव घेतली आणि दोघांना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर दोघांनाही रात्री वीजेच्या खांबाला बांधलं. इतकंच नाही तर सकाळ होताच गावकऱ्यांनी जबरदस्तीने दोघांचं लग्न लावून दिलं. (हे पण वाचा : बोंबला! नवरीने लग्न मंडपातच घेतली नवरदेवाची शाळा,२ चा पाढा नाही आला तर लग्नास दिला नकार!)
मीडिया रिपोर्टनुसार, हा तरूण महिलेच्या माहेरच्या गावाजवळ राहतो. तिचा पती रात्री कामासाठी बाहेर गेला होता. हे त्याला प्रेयसीने सांगितले तर तो तिला भेटायला लगेच आला. मात्र, गावातील लोकांनी त्यांना रंगेहाथ पकडून चांगलाच धडा शिकवला.
विवाहितेबाबत सांगितलं जात आहे की, महिलेला एक २ वर्षांची मुलगी आहे. तिला महिलेच्या पतीने स्वत:जवळ ठेवले आहे. महिलेने मात्र आपल्या प्रियकरासोबत न राहता पतीसोबत राहायची इच्छा व्यक्त केली आहे. महिलेचं म्हणणं आहे की, गावकऱ्यांनी दबरदस्तीने दोघांचं लग्न लावून दिलं. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध नाहीत. गावकऱ्यांना वारंवार सांगितल्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही. या प्रकरणात पोलिसांचं म्हणणं आहे की, दोन्ही कुटुंबामध्ये प्रकरण मिटवण्यासाठी चर्चा सुरू आहे.