आजकालच्या जगात कुणाला कशाचं वेड असेल सांगता येत नाही. एखादा छंद किंवा सवय म्हणा, ती जर जडली तर माणूस कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही. सध्याच्या काळात तुम्ही बहुतांश कॉलेज युवक, युवतींनी अंगावर टॅटू काढल्याचं दिसून आले असेल. शरीरावर एखादा दुसरा टॅटू काढला तर काही नाही पण पूर्ण शरीरच टॅटूने भरलेले असेल तर...? विचार करा त्या व्यक्तीकडे पाहून कसं वाटेल.
एका व्यक्तीने त्यांच्या पूर्ण अंगावर १,२,३ नव्हे तर हजारो टॅटू काढले आहेत. यासाठी त्याने ३३ लाखांहून अधिक खर्च केले आहेत. इतकेच नाही याच टॅटूमुळे युवकाला नोकरी मिळाल्याचा दावाही त्याने केला आहे. टॅटूमुळे नोकरी शोधणं सोप्प झालं असं तो म्हणतो. या व्यक्तीचं नाव कराक स्मिथ असं आहे. तो ४१ वर्षाचा आहे. ब्रिटन शेफील्डमध्ये तो राहतो. त्याच्या या अनोख्या फॅशनमुळे त्याला चक्क १ आठवड्यात ७ ठिकाणाहून नोकरीचा कॉल आल्याचा दावा त्याने केला आहे.
कराकने वयाच्या १८ व्या वर्षी त्यांच्या अंगावर पहिला टॅटू बनवला होता. आता तो दोन मुलांचा बाप आहे. त्याच्या शरीरावरील ९० टक्के भाग टॅटूने व्यापलेला आहे. केवळ गळा आणि नाक हे सोडून शरीरावरील प्रत्येक भागात त्याने टॅटू काढला आहे. सध्या कराक स्थानिक प्राधिकरणाकडे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. तो गँग आणि गन यामध्ये सहभागी असलेल्या मुलांना योग्य दिशेने नेण्यासाठी मदत करतो. लोकं मला नेहमी कमेंट करतात पण मी त्यांना चॅलेंज देऊन सांगतो. तुम्हाला कधी जॉब मिळणार नाही. परंतु मी कधीही बेरोजगार राहणार नाही.
तसेच वयाच्या १८ वर्षापासूनच मी जॉब करत आहे. एक वेळ अशी आली होती जेव्हा मला आठवड्याला ६-७ ठिकाणांहून नोकरीची ऑफर आली होती. मला वाटायचं टॅटूमुळे कधी नोकरी मिळणार नाही कारण मी एका सामान्य सोशल वर्करपेक्षा वेगळा दिसतो. अनेक लोक मला कमेंट करून बोलतात मी काय काम करतो? कारण त्यांनाही टॅटू बनवायचा आहे. अनेकांना वाटतं टॅटू बनवल्यानंतर काम मिळणार नाही. परंतु टॅटू बनवल्यानंतरही काम मिळू शकतं असं कारक स्मिथनं सांगितले. टॅटूमुळे अनेक प्रकारचे जॉब येतात. त्यात मॉडेलिंग, पॉप्युलर टीव्हीवर शोवर टॉप बॉय बनू शकतो. अनेक टॅटू इन्व्हेंटमध्ये कराकनं भाग घेतला आहे. सध्या कराकच्या संपूर्ण अंगावर ३३ लाख रुपयांपेक्षा अधिक टॅटू आहेत.