शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

मित्राचा सुट घालून अन् मित्राचाच लॅपटॉप घेऊन गेला इंटरव्युला पण त्यानंतर असे झाले की...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 6:45 PM

आंत्रप्रन्योर विशाल भारद्वाज (Entrepreneur Vishal Bhardwaj) यांनी एका अशा तरुणाचा किस्सा सांगितला, जो मुलाखतीला येताना आपल्या मित्राचा सूट घालून (Man wore friend’s clothes for interview) आला होता. ते इंटर्नशिपसाठी मुलाखती घेत होते. जेव्हा झारखंडच्या या तरुणाने त्यांचे मन जिंकले. विशाल यांची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.

देशातील कित्येक विद्यार्थी हे अतिशय बिकट परिस्थितीमधून पुढे येत नाव कमवतात. अशाच एका तरुणाची गोष्ट सध्या लिंक्डइन या साईटवर प्रसिद्ध होते आहे. टेडएक्स स्पीकर आणि आंत्रप्रन्योर विशाल भारद्वाज (Entrepreneur Vishal Bhardwaj) यांनी एका अशा तरुणाचा किस्सा सांगितला, जो मुलाखतीला येताना आपल्या मित्राचा सूट घालून (Man wore friend’s clothes for interview) आला होता. ते इंटर्नशिपसाठी मुलाखती घेत होते. जेव्हा झारखंडच्या या तरुणाने त्यांचे मन जिंकले. विशाल यांची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.

विशाल आपल्या पोस्टमध्ये (Vishal Bhardwaj LinkedIn post) लिहितात, “व्हिडीओ कॉलवरील मुलाखतीसाठी सहसा तरुण साधेच कपडे वापरतात. पण हा मुलगा अगदी सूट आणि टाय घालून इंटरव्ह्यू देत होता. काही वेळ बोलल्यानंतर आम्ही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा करू लागलो. त्याने सांगितलं, की परिस्थिती नसतानाही त्याच्या आई-वडिलांनी कशा प्रकारे त्याच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. शिवाय त्याने प्रामाणिकपणे हेदेखील कबूल केलं, की त्याने घातलेला सूट त्याच्या एका मित्राचा आहे, आणि मुलाखतीसाठी वापरत असलेला लॅपटॉपही दुसऱ्या मित्राचा (Man borrowed friend’s Laptop for interview) आहे. त्याच्या मित्रांनी मुलाखतीसाठी तयारी करताना त्याची मदत केलीच, पण मुलाखतीच्या आधी त्याच्या पाठीमागे दिसणारं बॅकग्राऊंड अधिक चांगलं दिसावं यासाठी पडदे, फुलं लावून सजावटही केली.” ही माहिती ऐकल्यानंतर भारद्वाज भलतेच खूश झाले होते.

यानंतर या उमेदवाराने त्याच्या मित्रांनाही भेटण्याची भारद्वाज यांना विनंती केली. त्यांनीदेखील ही विनंती स्वीकारत, त्याच्या मित्रांना व्हिडीओ कॉलमध्ये येण्यास सांगितले. या सर्वांशी थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर भारद्वाज यांनी या उमेदवाराची निवड (Vishal Bhardwaj impressed by Jharkhand youngster) करण्यात आल्याचे जाहीर केले.

“त्याची निवड झाल्याचे जाहीर होताच, त्याच्या कुटुंबियांपेक्षाही त्याचे मित्र जास्त आनंदी झाले होते. तो आयुष्यात पुढे भरपूर पैसे कमावेल, पण या मित्रांसारखी मौल्यवान संपत्ती त्याने आधीच कमावली आहे. तो सध्या श्रीमंत आहेच, पुढे तो भरपूर पैसेही मिळवेल याची मला खात्री आहे. अशी माणसं आणि असे मित्र हीच खरी संपत्ती आहेत.” असेही भारद्वाज पुढे म्हणाले. या तरुणाला नोकरी देण्यावरच भारद्वाज थांबले नाहीत, तर आपण आपल्या कंपनीकडून त्या तरुणाला आणि त्याच्या तिन्ही मित्रांना कस्टमाईज्ड सूट पाठवणार असल्याचे विशाल यांनी जाहीर केले. “या सर्वांना सुटाबुटात तयार झालेलं पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे” असंही ते म्हणाले.

दरम्यान, लिंक्डइनवर या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. कित्येक लोक यावर आपलेही अनुभव शेअर करत आहेत. एमएसएन या इंटरनॅशनल कंपनीत प्रिन्सिपल कन्सल्टन्ट असणाऱ्या मनोज एसएन यांनी आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून अजूनही आपल्या शाळेतील मित्रांच्या संपर्कात असल्याचे म्हटले. तर, विशाल यांच्या कंपनीमधील वर्क कल्चर पाहून, आपल्यालाही तिथे काम करण्याची इच्छा होत असल्याचे मत कॉरटेक एनर्जी कंपनीतील इंजिनिअर मणियार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके