काही लोक इतकं बिनधास्तपणे जीवन जगत असतात की, पाहणारा विचार करत राहतो की हे लोक असं कसं करतात. अनेकजण आपल्या आनंदासाठी एक पाऊल पुढे टाकण्याआधी दहा वेळा विचार करतात. तर एक तरुणी अशीही आहे जिने मौजमस्तीसाठी ६५ अनोळखी पुरुषांना आपल्या घरी बोलावले आणि पार्टी सुरू केली. वर्षभरात तिने अशा १७ पार्ट्या केल्या. तसेच यापुढेही त्या सुरू ठेवू इच्छित आहे.
या तरुणीचं नाव आहे कॅसिड डेव्हिस. ती अमेरिकेतील रहिवासी आहे. ५ वर्षांपर्यंत कॅडिसी आपल्याला एक बॉयफ्रेंड शोधण्यासाठी लॉस एंजेलिसच्या सर्व सिंगल तरुणांच्या साइटवर तरुणांना डेट करत होती. पण कुठे काही जुळत नव्हतं. डेव्हिस स्वत: एक अभिनेत्री आहे. तसेच तिने आतापर्यंत अभिनेत्यांपासून, लेखक, जादुगार आणि संगीतकारांपर्यंत अनेकांना डेट केलं आहे. २०२२ मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या आधी तिला एक जबरदस्त कल्पना सूचली. त्यानंतर तिने घरी सिंगल्स पार्टी आयोजित केली.
डेव्हिसने स्वत:ला डेटिंग अॅपवरून हटवले होते. त्यानंतर आपल्या मित्रांकडून तिने डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेटणाऱ्या तरुणांना बोलावण्यास सांगितले. तिला वाटले होते की, कुणी येणार नाही. अशा परिस्थितीत तिने अशा ६५ जणांना बोलावले, ज्यांना ती आधी भेटली होती. तसेच बारमध्ये भेटलेल्या एका तरुणालाही ती भेटली होती. त्या तरुणावर तिचा क्रश होता. व्हिडीओ कन्फेशनच्या माध्यमातून तिने ही बाब त्याला सांगितली होती. तेव्हापासून गेले वर्षभर ते एकमेकांना डेट करत आहेत. मात्र डेव्हिसला सिंगल्स पार्टीची आयडिया एवढी आवडली की, ती आजसुद्धा पार्टी आयोजित करते.
डेव्हिसच्या या पार्ट्या लॉस एंजेलिसमध्ये आयोजित करतात. त्याने सन २०२२ मध्येच १७ पार्ट्या आयोजित केल्या होत्या. यामध्ये येण्याची पद्धत अगदी सोपी आहे. तुम्ही डेटिंग अॅपवरून मॅच झालेल्या व्यक्तीला बोलवाल आणि तिथे समोरासमोर भेट होईल. ती आपल्या पार्टीबाबत टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवरही लोकांना बोलावते. तसेच तिच्या व्हिडीओंना खूप सपोर्ट मिळतो. त्याच्या तिकिटाची किंमत १००० ते ३००० रुपयांपर्यंत असते. या पार्टीमध्ये शेकडो लोक सहभागी होतात.