आजकाल लोक इतके क्रिएटीव्ह झाले आहेत की, कधी काय बनवतील काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर हेच दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात तीन तरूणांनी चक्क माती (Car From Mud) आणि प्लास्टिकपासून एक कोट्यावधी रूपयांची कार तयार केली. व्हिडीओतील तरूणांची क्रिएटिव्हीटी पाहून तुम्हाला हैराण व्हाल. या तरूणांचं सोशल मीडिया यूजर्स भरभरून कौतुक करत आहेत.
व्हिडीओत बघू शकता की, तीन तरूण आपल्या क्रिेएटिव्हीटीचं शानदार उदाहरण सादर केलं आहे. मोठमोठे कलाकारही त्यांची ही क्रिएटिव्हीटी पाहून आश्चर्यात पडले. व्हिडीओत बघू शकता की, तरूण प्लास्टिक, माती आणि पत्र्याच्या मदतीने एक शानदार कार बनवत आहेत. ही कार दिसायला पूर्णपणे Bugatti कारसारखी आहे. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे ही कार चालते सुद्धा.
मातीपासून तयार ही कार पाहिल्यानंतर खऱ्या-खोट्यात फरक करणं अवघड होतं. बघू शकता की, सर्वातआधी तरूण माती आणतात. या मातीचा वापर ते कार बनवण्यासाठी करतात. मातीसोबतच यासाठी ते प्लास्टिक आणि पत्र्याचाही वापर करतात. नंतर कारला एक इंजिनही बसवतात.
ही देसी जुगाड करून तयार केलेली कार रस्त्यावर निघाली तेव्हा लोक बघतच राहिले. हा कार मेकिंगचा व्हिडीओ IPS अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिलंय, 'तुमच्यात अब्जो रूपयांची क्रिएटिव्हीटी आणि स्किल्स असेल तर कोट्यावधी रूपयांची Bugatti कार खरेदी करण्याची काय गरज आहे.