Masala Maggie for 193 Rs: तुम्हाला भूक लागली असेल आणि तुम्हाला पटकन काहीतरी खायचे असेल तर तुमच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे मॅगी. मॅगी ही दोन मिनिटांत तयार होते आणि लोकांना ती खूप आवडते. मॅगीची किंमतही 10 रुपयांपासून सुरू होते. कदाचित त्यामुळेच आज मॅगी हा सगळ्यांचा आवडतं फास्ट फूड आहे. साधारणपणे बाहेर बनवून विकत मिळणाऱ्या मॅगीची किंमत जास्तीत जास्त 50 रुपये असते. पण एका ठिकाणाबद्दल सांगायचे तर या मॅगीची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. अलीकडेच एका युट्युबरने मॅगीच्या किमतीचा अनुभव शेअर केला आहे.
युट्युबरने सांगितले की ती विमानतळावर उतरला होता आणि तिला खूप भूक लागली होती. तिने विमानतळावर मसाला नूडल्स खरेदी केले. जेवून झाल्यावर नूडल्सचे बिल हातात आले तेव्हा तिला धक्काच बसला. एअरपोर्टवाल्यांनी नूडल्सचे बिल १९३ रुपये लावले होते. यूट्यूबर सेजल सूदने त्या नूडल्सचे बिल तिच्या सोशल मीडिया मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर शेअर केले आहे, जे आता व्हायरल होत आहे. बिलात नूडल्सची किंमत 184 रुपये आणि जीएसटी 9.20 रुपये आहे. सारं जोडून त्या नूडल्सची किंमत १९३ रुपये झाली आहे. 20 पैसे वजा केल्यावर एकूण बिल राउंड फिगरमध्ये 193 रुपये आले आहे.
युट्युबरकडे नूडल्सचे बिल देण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून तिने बिल भरले आणि आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. तिने लिहिले की, तिला यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजत नव्हते. 'एवढा दर? असं का? हे नूडल्स जेट इंधनापासून बनतात का? अशा कमेंट्स युट्युबरच्या या पोस्टवर अनेकांनी केल्या. एका यूजरने लिहिले– विमानतळावरील हे सर्वात स्वस्त जेवण आहे. ज्याला उत्तर देताना युट्युबरने लिहिले की तिला आधीच भूक लागली होती, म्हणून तिने नूडल्स ऑर्डर केल्या होत्या.