YouTube वर तुम्हाला एकापेक्षा एक असे कारनामे तुम्हाला पाहायला मिळाले असतील. युट्यूबवर अनेक एक्सपरिमेंटल चॅनल्स आहे, ज्याद्वारे युट्यूबर्स आपलं कौशल्य जगासमोर आणत असतात. अनेक जण काही ना काही हटके करण्याचाही प्रयत्न करत असतात. अशाच एका भारतीय युट्यूबरनं ब्युस्टार कंपनीचा विंडो एसी घेतला आणि तो आपल्या कारमध्ये फिट केला. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. परंतु हे खरंय. अधिक गरमीमुळे अनेकदा तुमच्या कारच्या एसीची परफॉर्मन्स खराब होते. अशातच तुम्हाला कारमध्ये एखादा पॉवरफुल विंडो एसी मिळाला तर… वास्तविक पाहता ही तुम्हाला मजा वाटेल. पण या पठ्ठ्यानं केलेला हा प्रयोग यशस्वी ठरलाय.
FWS - FunWithScience नावाचा युट्यूब चॅनल असेच काही ना काही प्रयोग करत असतो. या चॅनलवर जून महिन्यात ऑएक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यात युट्यूबरनं टाटा पंचच्या बुटस्पेसमध्ये एक विंडो एसी फिट केल्याचं दिसत आहे. तुम्हाला जाणून घएऊन आश्चर्यही वाटेल, तो विंडो एसी कामही करत आहे.