शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
5
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
6
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
7
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
8
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
9
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
10
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
11
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
13
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
14
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
16
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
17
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
18
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
19
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
20
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

खर्च शून्य! तरीही तो ‘आलिशान’ जगतो! - कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:11 PM

सँटिॲगो सध्या २६ वर्षांचा आहे. एका कंपनीत तो जॉब करतो. सहा आकडी पगार घेतो; पण, तो सांगतो, एवढा पगार मला लागतच नाही, तर मी तो कशासाठी वापरू?

जगण्यासाठी किती पैसे लागतात? चांगलं, आनंदी, समाधानी जगण्यासाठी खूप पैसे कमवावे लागतात का? किंवा त्यासाठी मन मारून जगावं लागतं का? स्पेनच्या सँटिॲगो प्युर्टोलास या तरुणाला यासंदर्भात विचारा. तो सांगेल, चांगलं, समाधानी आयुष्य जगण्यासाठी काय करावं लागतं ते! 

सँटिॲगो सध्या २६ वर्षांचा आहे. एका कंपनीत तो जॉब करतो. सहा आकडी पगार घेतो; पण, तो सांगतो, एवढा पगार मला लागतच नाही, तर मी तो कशासाठी वापरू? गेल्या सात वर्षांपासून तो आपल्या पगाराची तब्बल ९५ टक्के बचत करतो आहे! म्हणजे जवळपास तो काहीच खर्च करीत नाही!सँटिॲगोचं मुख्य ध्येय आहे, ते म्हणजे आनंदी जगायचं. त्यासाठी त्याला फार मरमरही करायची नाही आणि आपल्याला जे आवडतं तेच करायचंय. भविष्याचेही त्याचे प्लॅन ठरलेले आहेत. वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्याला निवृत्त व्हायचं आहे आणि उर्वरित आयुष्य स्वत:च्या मनाप्रमाणे जगायचं आहे. सँटिॲगोला निसर्गाची फार आवड. त्यामुळे शहर सोडून तो अशा ठिकाणी राहायला गेला, जिथे त्याला निसर्गाचा मन:पूत आनंद घेता येईल.

त्याचं म्हणणं आहे, आनंद कधीच पैशावर अवलंबून नसतो. तुम्ही किती पैसे कमावता आणि तुमच्याकडे किती महागड्या, किमती वस्तू आहेत, तुमच्याकडे किती कार आहेत, तुमचं घर किती आलिशान आहे, अशा भौतिक गोष्टींवर तुमचा आनंद ठरत नाही.  आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वत:चं एक घर विकत घ्यावं लागेल, हे त्याला माहीत होतं. त्यामुळे त्यानं आपल्याला आवडेल अशा अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी, कॅनरी बेटांवरील एका छोट्याशा गावात घर विकत घेतलं. त्याच्या मनासारखं तर हे घर होतंच; पण, तिथले दरही बाजारभावापेक्षा खूपच कमी होते. शिवाय त्यानं बिल्डरशी घासाघीस करून बऱ्याच स्वस्त दरात हे घर पदरात पाडून घेतलं. शहराच्या तुलनेत अतिशय कमी खर्च, निसर्गरम्य ठिकाण आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीच्या संधी या गोष्टीही त्यानं एकाच वेळी साध्य केल्या. 

हे घर घेण्यासाठी त्यानं आपल्या जवळच्या एका मित्राला राजी केलं. कारण, त्याचा हा मित्रही त्याच्याच विचारांचा होता. घरावर पैसे खर्च झाले असले, तरी हे घर पुढे आपल्याला तहहयात पैसे मिळवून देत राहील याचीही तजवीज त्यांनी केली. आपलं हे घर त्यांनी तीन भागात विभागलं. घराचा एक भाग त्यानं स्वत:साठी ठेवला, दुसरा भाग  ‘एअरबीएनबी’ला भाड्यानं देण्यासाठी आणि तिसरा भाग दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ठेवला. त्यातून भाडं किंवा इतर उत्पन्न मिळत राहील, याचाही बंदोबस्त केला. आपला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओही त्यानं तयार केला आहे. तो आपलं रोजचं जेवण मुख्यत: घरीच तयार करतो. कारण घरचंच जेवण त्याला आवडतं, आपल्या मनासारखं, आरोग्यदायी जेवण जेवल्यामुळे प्रकृतीची चिंता मिटते; शिवाय बाहेर जेवल्यामुळे होणारा अतिरिक्त खर्चही वाचतो, असा त्याचा याबाबतचा अनोखा फंडा आहे. याचा अर्थ तो कधी बाहेर जेवायलाच जात नाही का? चमचमीत, जिभेला आवडेल असं कधीच काही खात नाही का? तर तसंही नाही. या सगळ्या गोष्टी तो करतो; पण, मर्यादित प्रमाणात. सँटिॲगो प्रवासासाठीही कायम स्वस्त आणि मस्त पर्याय वापरतो. प्रवासाचं त्याचं प्लॅनिंग आधीच केलेलं असतं. खूप आधीच बुकिंग केल्यामुळे त्याला तिकीटही खूप स्वस्तात मिळतं. विमानानंही तो प्रवास करतो, नाही असं नाही; पण, सगळ्या स्किम्सचा तो फायदा घेतो. त्यामुळे रेल्वे, बसपेक्षाही त्याचा विमानाचा प्रवास स्वस्त होतो!कपड्यांच्या बाबतीत त्याचं काय धोरण आहे? फॅशनेबल, महागडे कपडे तो वापरतो की नाही? सँटिॲगो म्हणतो, फॅशनेबल किंवा महागड्या कपड्यांपेक्षा माझ्यासाठी ‘कम्फर्ट’ जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्या कपड्यांमध्ये मला खरोखरच बेस्ट फिल येतो, असेच कपडे मी वापरतो! फॅशन ही कधीच तुमच्या कम्फर्टला पर्याय ठरू शकत नाही. कम्फर्ट हीच माझ्यासाठी फॅशन आहे! जवळपास शून्य खर्चात मी आलिशान आयुष्य जगतो!

कशाला हवी लक्झरी कार?तुम्ही म्हणाल, सँटिॲगो इतका ‘काटकसरी’ आहे, तर मग त्याच्याकडे कार नसेलच. पण, त्याच्याकडे कार आहे! मात्र, ही कार अतिशय साधी आहे. सँटिॲगो म्हणतो, कार नसली तर अनेक कामं अडतात; पण, लक्झरी कार आणि साधी कार, यात कितीसा फरक असतो? माझी कारही मी स्वत:च दुरुस्त करतो. त्यामुळे माझं कधीच, काहीच अडत नाही. त्याचा आणखी एक फंडा आहे, तो म्हणतो, तुम्हाला तुमच्या अत्यावश्यक कामांसाठी महागड्या लॅपटॉपची गरज असेल, तर तो जरूर विकत घ्या; पण, साध्या फोननं तुमचं काम होत असेल, तर मग महागडा आयफोन कशाला हवा?