नवी दिल्ली : भारतासह एकूण १५ देशांतील ४२२ खेळाडूंचा ३0 आणि ३१ मे रोजी मुंबईत होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रातील लिलाव प्रक्रियेत सहभाग असणार आहे. लिलाव प्रक्रियेत ५८ परदेशातील खेळाडूंना समाविष्ट करून घेण्यात आले आहे. याशिवाय ८७ खेळाडूंची निवड देशव्यापी कार्यक्रमातून करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा उद्देश भविष्यासाठी कबड्डी खेळाडूंचा शोध घेणे हा आहे.या खेळाडूंवर १२ फ्रँचायझी संघ बोली लावतील. त्यातील ९ संघांनी २१ खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवले आहे, तर तीन फ्रँचायझी नव्याने आपल्या संघाची बांधणी करतील. या लिलाव प्रक्रियेत भारताशिवाय इराण, बांगलादेश, जपान, केनिया, कोरिया, मलेशिया, श्रीलंकेतील खेळाडूदेखील समाविष्ट आहेत. (वृत्तसंस्था)
प्रो कबड्डीच्या लिलाव प्रक्रियेत ४२२ खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 4:30 AM