मुंबई : आपल्या मुलानं मोठं व्हावं, नाव कमवावं, पैसा कमवावा, असं बऱ्याच पालकांना वाटत असतं. तसं त्याच्या बाबतीतही झालं. कारण घरची परिस्थिती बेताचीच होती. एका शेतकऱ्याच्या कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. त्यामुळे घरी काहीवेळा पैशांची चणचण भासायची. त्यावेळी आपला हा मोठा मुलगा हे दिवस बदलेल, असं त्याच्या घरच्यांना वाटतं होतं. एक दिवस असा उजाडला की तो करोडपती झाला, पण...
लहानपणापासून त्याने हलाखीचे दिवस काढले. त्यामुळे त्याला दोन वेळच्या जेवणासाठी अभ्यासावर पाणी सोडावे लागले होते. पण त्याला वेडं होतं ते कबड्डीचं. काम करता करता तो कबड्डीही खेळायचा. त्याच्याकडे गुणवत्ता होती. त्यामुळे कबड्डीमध्ये त्याला ओळख मिळायला सुरुवात झाली. त्याचा खेळ पाहून तो भारतीय संघात आला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये पहिला करोडपती होण्याचा मान त्याने मिळवला. ही गोष्ट आहे कबड्डीपटू दीपक हुडाची. करोडपती होतं त्यानं आपल्या आई-बाबांचं स्वप्न पूर्ण केलं, पण... आता तो करोडपती झालाय हे बघायला त्याचे आई-बाबा नाहीत.
दीपक चार वर्षांचा होताना त्याची आई स्वर्गवासी झाली. त्यानंतर वडिल राम निवास यांनी त्याचा आईची उणीव कमी करण्याचा प्रयत्न केला. पण दीपक बारावीमध्ये असताना त्याच्या बाबांचांही मृत्यू झाला. त्यानंतर दीपकपुढे कुटुंब कसं चालवायचं, हा मोठा प्रश्न उभा राहीला, त्यासाठी त्याने अभ्यास सोडून काम करायला सुरुवात केली. पण आता दीपक करोडपती झाला, पण ते पाहायला त्याचे आई-बाब मात्र या जगात नाहीत.