मुंबई - प्रो कबड्डीमुळे घराघरात पोहोचलेल्या कबड्डीला ग्रहण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मनमानी कारभाराविरोधात न्यायलयात धाव घेणाऱ्या सदस्यांनी आता प्रो कबड्डीला लक्ष्य केले आहे. यशाची शिखरे चढत असलेल्या प्रो कबड्डीला आव्हान देण्यासाठी माजी दिग्गज खेळाडूंनी मोट बांधली आहे. या खेळाडूंनी स्थापन केलेल्या नवीन भारतीय कबड्डी फेडरेशनने प्रो लीगच्या धर्तीवर नवीन लीगची नुकतीच घोषणा केली. 'इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीग' असे या लीगचे नाव आहे.
आशियाई स्पर्धेतील कबड्डी संघ निवडताना मोठ्याप्रमाणावर पक्षपातीपाणा झाल्याचा दावा करण्यात येत होता. त्याविरोधात काही माजी खेळाडूनी न्यायलयाचे दार ठोठावले. हा मुद्दा ताजा असताना या नव्या लीगची घोषणा म्हणजे जनार्दन गेहेलोत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचे कबड्डी वर्तुळात बोलले जात आहे. भारतीय महासंघावर गेहलोत यांच्या कुटुंबाचेच वर्चस्व जाणवत आहे आणि त्याला आता विरोध होऊ लागला आहे.
भारताचे दिग्गज आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूनी एकत्र येउन न्यू कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली आहे. त्यांच्याच महासंघाने 'इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीग'ची घोषणा केली आहे. यामध्ये आशियाई स्पर्धेची दोन सुवर्णपदक नावावर असलेले एस राजराथीन, विश्वचषक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते सुरेश कुमार, चार राष्ट्रीय जेतेपद नावावर असलेले मुरुगनाथ, मधुकर यादव व सी होनप्पा अशा अनेक माजी खेळाडून्चा समावेश आहे. स्पर्धेचे फॉरमॅट८ संघांचा समावेश६२ सामने दीड महिने चालणार स्पर्धाप्रत्येक संघात ३-४ परदेशी खेळाडून्यूझीलंड, पोलंड, अर्जेंटिना, टांझानिया ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, इंग्लंड, कॅनडा आणि अमेरिका या देशांतील खेळाडूचा सहभागDSPORT वाहिनीवर थेट प्रक्षेपण
पाकिस्तानचे खेळाडूही खेळणार लीग नव्या लीगमध्ये पाकिस्तानचे खेळाडूही खेळणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. ही घोषणा ते प्रत्यक्षात अमलात कसे उतरवतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.