नागपूर : आॅरेंजसिटीला ‘होमग्राऊंड’ बनविणा-या बंगळुरु बुल्सने कर्णधार रोहित कुमारच्या नेतृत्वात प्रो- कबड्डीच्या पाचव्या पर्वात ‘ब’ गटात शुक्रवारीबंगळुरु बुल्सने आक्रमक खेळाने सुरुवात केली पण तमिल थलायवासने त्यांना अखेरपर्यंत झुंजविल्याने बंगळुरुला अवघ्या एका गुणाने निसटता विजय मिळाला. सामन्यात बेंगळुरुने ३२ तर थलायवासने ३१ गुणांची कमाई केली.पहिल्या सामन्यात हैदराबाद येथे तेलगू टायटन्सवर ३१-२३ असा विजय नोंदविणाºया बंगळुरुला आज दुसºया सामन्यात कर्णधार रोहितने पहिला गुण मिळवून दिला. त्याने दोन बोनससह एकूण ११ गुणांची कमाई केली तर तमिल थलायवाने लागोपाठ दोन बोनस गुणांसह चांगली सुरुवात करुनही त्यांना नंतर गुण मिळविणे कठीण गेले.रोहीत कुमारने या सामन्यात आपल्या कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. रेडींगमध्ये आपल्या संघाची धुरा खांद्यावर सांभाळताना रोहीत कुमारने पॉर्इंट मिळवले, याशिवाय रोहीतने बचावातही काही चांगले पॉर्इंट मिळवल्याने मध्यांतरापर्यंत बंगळुरुने थलायवावर २३-८ अशी १५ गुणांची भक्कम आघाडी मिळविली होती.मध्यांतरानंतर मात्र तामिळ थलायवासच्या खेळाडूंनी मुसंडी मारुन खेळ केला. संघासाठी सहा गुणांची कमाई करणारा कर्णधार अजय ठाकूरच्या आक्रमक चढायाच्या बळावर थलायवासच्या खेळाडूंनी बंगळुरुचा संपूर्ण संघ बाद करीत अखेरच्या पाच मिनिटापर्यंत गुणसंख्या ३१-२२ अशी करीत चुरस निर्माण केली. अखेरच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल याबद्दल सस्पेन्स कायम होते. थलायवासच्या खेळाडूंनी विजयाची अपेक्षा बाळगून काही सेकंद शिल्लक असताना टिव्ही रिप्ले देखील मागितला. पण त्यातही अपयश येताच पराभव पत्करावा लागला. त्याआधी, बॉलिवुड स्टार विद्युत जमवाल याच्या नेतृत्वात राष्टÑगीताने सामन्याला सुरुवात झाली.भरघोस प्रतिसाद...प्रो-कबड्डीला नागपुरात प्रतिसाद मिळेल की नाही याबद्दल अनेकांनी शंका वर्तवली होती. मात्र या सर्व शंकांना मागे सारत प्रो-कबड्डीने पाचव्या पर्वाच्या पहिल्याच सामन्यास नागपूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात पाच हजार प्रेक्षक क्षमतेच्या हॉलमध्ये चार हजारावर कबड्डीप्रेमींनी उपस्थिती दर्शवित सामन्याचा आनंद लुटला. विशेषत:महिला आणि मुलींनीही सामन्याला गर्दी केली होती.
प्रो- कबड्डी : बंगळुरु बुल्सचा निसटता विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 1:00 AM