मुंबई : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. या लीगने अल्पावधीतच क्रीडा प्रेमींना आपलेसे केले आहे. त्यामुळे सहाव्या पर्वाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या पर्वात प्रत्येक संघात बरेच बदल झाले असल्यामुळे ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. गतविजेत्या पाटणा पायरेट्स आणि तमिळ थलायव्हाज यांच्यात उद्धाटनीय सामना होणार आहे. त्यानंतर यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण या महाराष्ट्र डर्बीचा सामना होईल. चेन्नई आणि सोनीपत या टप्प्यानंतर प्रो कबड्डीचे सामने पुण्यात होतील. 18 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत आंतरविभागीय सामने पुण्यात होणार आहे. मुंबईचा टप्पा हा 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे. याशिवाय पाटणा, नोएडा, अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता व कोची या शहरांमध्ये प्रो कबड्डीचे सामनो होतील. स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईत 5 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.पुणे आणि मुंबईच्या टप्प्यातील सामने कधी व कोणते ?पुणे : 18 ते 25 ऑक्टोबर18 ऑक्टोबरः पुणेरी पलटन वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स19 ऑक्टोबरः पाटणा पायरेट्स वि. तेलुगु टायटन्स; पुणेरी पलटन वि. जयपूर पिंक पँथर्स20 ऑक्टोबरः युपी योद्धा वि. बंगाल वॉरियर्स; पुणेरी पलटन वि. यू मुंबा21 ऑक्टोबरः दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरियर्स; पुणेरी पलटन वि. बेंगळुरु बुल्स22 ऑक्टोबरः विश्रांती23 ऑक्टोबरः यू मुंबा वि. तेलुगु टायटन्स; पुणेरी पलटन वि. तामिळ थलायवाज24 ऑक्टोबरः बेंगळुरु बुल्स वि. हरयाणा स्टीलर्स; पुणेरी पलटन वि. युपी योद्घा25 ऑक्टोबरः विश्रांती मुंबईः 9 ते 15 नोव्हेंबर9 नोव्हेंबरः यू मुंबा वि. जयपूर पिंक पँथर्स; बंगाल वॉरियर्स वि. तेलुगु टायटन्स10 नोव्हेंबरः पाटणा पायरेट्स वि. बंगाल वॉरियर्स; यू मुंबा वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स11 नोव्हेंबरः यू मुंबा वि. हरयाणा स्टिलर्स12 नोव्हेंबरः विश्रांती13 नोव्हेंबरः पुणेरी पलटन वि. तेलुगु टायटन्स; यू मुंबा वि. युपी योद्धा14 नोव्हेंबरः तामिळ थलायवाज वि. हरयाणा स्टीलर्स; यू मुंबा वि. बेंगळुरू बुल्स15 नोव्हेंबरः पाटणा पायरेट्स वि. दबंग दिल्ली; यू मुंबा वि. तामिळ थलायवाज
संपूर्ण वेळापत्रकासाठी लिंकवर क्लिक करा...
https://www.prokabaddi.com/schedule-fixtures-results