मुंबई : ‘राष्ट्रीय स्पर्धेत साखळीतच गारद झालेल्या महाराष्ट्राच्या महिला संघाच्या कामगिरीची चौकशी संघटनेचे उपाध्यक्ष देवराम भोईर यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीतर्फे करण्यात येईल,’ असे राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी सांगितले. कबड्डी दिनानिमित्त या खेळात योगदान असणाऱ्यांचा पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी पाटील यांनी राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीचा समाचार घेतला.कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिन राज्य कबड्डी संघटनेतर्फे मुंबई येथे रंगशारदा सभागृहात कबड्डी दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी कबड्डीच्या विकासासाठी योगदान देणाºया खेळाडू, पंच, कार्यकर्ते आणि पत्रकार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी, ‘बँका, सरकारी-निमसरकारी आस्थापना, तेल व विमा कंपन्यांत खेळाडू भरतीसाठी प्रयत्न करणार,’ असे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष व खा. गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रात कबड्डी हा खेळ क्रीडा चाहत्यांना आकर्षित करीत आहे; परंतु राज्य आणि देशाचे क्रीडा त्याचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे बँका व इतर कॉर्पोरेट जगत या खेळाला आर्थिक मदत देण्यास नाखुश असतात. देशाच्या व राज्याच्या क्रीडा खात्याच्या आर्थिक धोरणाच्या मदतीने राबविण्यासाठी आणि या आस्थापनांमध्ये कबड्डी संघ स्थापन करून खेळाडंूना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ‘लोकमत’चे (औरंगाबाद) क्रीडा पत्रकार जयंत कुलकर्णी यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले.
महिला संघाच्या कामगिरीची चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 4:06 AM