डोंबिवली: शहर वाहतूक उपविभाग अंतर्गत म्हसोबा चौक, ९०फिट रोड, डोंबिवली पूर्व या ठिकाणी शनिवारी उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांचे आदेशाने फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली असून १८२ बेशिस्त वाहनचालकावर कारवाई केली. त्याद्वारे करून १ लाख ३१ हजार,१५० रुपये इतका दंड ठोठावण्यात आला.
विना हेल्मेट ४९, विना सीट बेल्ट २२, जम्पिंग सिग्नल ०६,ब्लॅक फिल्म ०१, ट्रिपल सीट ०४, फ्रंट सीट ०३, गणवेश न घालने ०३ व इतर ९४ अशा एकूण १८२ वाहन चलकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ७२ हजार ९०० रुपयांचा दंड जागीच वसूल करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये डोंबिवली वाहतूक विभागाचे ०१अधिकारी, ०९ पोलीस अंमलदार व ०८ वॉर्डन तसेच कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे ०२ अंमलदार,०१वॉर्डन व कल्याण वाहतूक उप विभागाचे ०२ पोलीस अंमलदार असे एकूण ०१अधिकारी, १३ अमलदार, ०९ वॉर्डन हजर होते. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सीसीटिव्ही कॅमेरा द्वारे वाहतूक विभागाकडून ई चलन कारवाई सुरू करण्यात आली असून सर्वांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची माहिती देऊन जनजागृती करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.