कल्याण- त्याच्या विरोधात देशभरात १०० गुन्हे दाखल आहेत. त्याला मोका लागला आहे. तसेच त्यांने पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून एकावर प्राणघातक हल्ला करुन जखमी केले होते. या कुख्यात इराणी चोरटयाला पोलिसानी कर्नाटकच्या धारवाड येथून जेरबंद केले आहे. त्याला अटक करताना कारवाई पथकातील तीन पोलिस जखमीझाले आहेत. अटक आराेपीचे नाव कासीम मुख्तार इराणी उर्फ तल्लफ असे आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि पाच महागड्या मोटार सायकल जप्त हस्तगत केल्या आहेत.
या आरोपीच्या विरोधात ठाणे जिल्ह्यात २० तर देशभरात १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. चैन स्न’चिंगच्या गुन्हयात तो फरार होता. चैन स्नचिंगच्या गुन्ह्यात तो सराईत होता. तो महिलांना लक्ष करीत त्यांच्या गळ्यातील चैन लंपास करुन पसार व्हायचा. २०२२ मध्ये आंबिवली येथील इराणी वस्तीत राहणारा जाफर इराणी या तरुणावर कासीम याने प्राणघातक हल्ला केला. जाफर हा पोलिसांचा खबरी आहे. इराणी चोरट्याची माहिती तो पोलिसांना देतो. या संशयातून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्ला करुन कासीम हा फरार झाला होता. कासीम हा कर्नाटक येथील धारवाडमध्ये लपून बसला आहे. याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पाेलिस निरिक्षक सर्जेराव पाटील, पोलिस निरिक्षक शरद जीणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने धारवाड गाठले. कासीमला पकडण्यासाठी धारवाड आणि कल्याणच्या पोलिस तपास पथकाला तारेवरची कसरत करावी लागली. कासीमला पकडण्यासाठी धारवाडचा एक आणि कल्याणचे दोन पोलिस जखमी झाले. अखेर त्यांला अटक करण्यात आले आहे. त्याला जेरबंद करुन कल्याणला आणले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि पाच महागड्या बाईक हस्तगत करण्यात आले आहेत. पूढील तपास खडकपाडा पोलिस करीत आहेत.