कल्याण : कल्याण डाेंबिवली महापालिकेकडून शहर साैदर्यीकरण माेहीम सुरु आहे. या माेहिमेअंतर्गत १५ दिवसात १ हजार पाेस्टर्स बॅनर्स काढण्याची कारवाई महापालिकेच्या विविध प्रभागात करण्यात आली असून शहर विद्रूप करणाऱ्या ३० जणांच्या विराेधात विविध पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेचे प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. खडकपाडा परिसरातील अरिहंत बिल्डर, स्मार्ट बाजार, ऑलिम्पिक जिम, प्रेरणा कोचिंग क्लासेस, बी.बी.आर.टी. इंटरनॅशनल स्कुल, हाउस ऑफ ३२ डेन्टल केअरच्या विराेधात खडकपाडा पाेलिस ठाण्यात तर टिटवाळ्यातील गणपती मंदिर पार्कींग येथल दिल्ली पब्लीक स्कूल, आरबीओपी अकादमी, आनंद हाेम्सच्या विराेधात टिटवाळा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शक्ती बेतुरकर चौक ते खडकपाडा सर्कल या परिसरातील स्मार्ट बाईट कॅम्प्युटर, सॅम कॅम्प्युटर, एमआर फालुदा आणि यूटू केक, बैलबाजार येथील ओम सुप्रिमो बिल्डींग समोरील से.झेवियर्स इंटरनॅशनल स्कुल, झोझवाला पेट्रोल पंप समोरील स्पोकन इंग्लिश व श्रीदेवी हॉस्पीटल समोरील अर्टेक कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विराेधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोळसेवाडीमधील श्रीम. कोमल- ग्लॅमर लुक, ड प्रभाग कार्यालयाजवळील डेव्हीड-टॅटो अकॅडमी, मलंग रोड, स्टॉर सिटी हॉस्पिटल जवळील मलेशियन शर्मा-हेअर कटींग सलून तसेच ओमकार-ओमकार ट्रेडिंग, एम.एस.बेकर्स यांवर कोसळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानपाडा रोड येथील रुद्राक्ष ज्वेलर्स, गणेश इंटरनेट सर्व्हिसच्या टिळकनगर पोलिस पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. येथे गुन्हे दाखल केले तसेच ९० फीट रोड येथील युरो किडस्, चोळे गांव येथील बॉक्स बर्न, मानपाडा रोड येथील बीरोबा दर्शन व कस्तुरी प्लाझा समोरील धुरव आय.ए.एस ॲकेडमी,साई आरोरा ग्रुप व टंडन रोड येथील ठाकुर हॉल आस्थापनांवर रामनगर पोलिस स्टेशन पाेलिस ठाण्यात डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोड, छन्नुर भवन येथील रोहन शेट्टी-हाऊन टाऊन बार, राजाराम परब-एसटेक आयटी. एज्युकेशन, राजाराम परब-स्पिकवेल इंग्लीश अकादमीच्या विराेधात विष्णुनगर पोलिस पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते, भारत पवार आदी विविध प्रभागातील अधिकाऱ्यांनी केली आहे.