शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

खोट्या कागदपत्रांद्वारे मिळवले १ हजार बांधकाम प्रमाणपत्र, ६५ बिल्डर्संवर गंभीर आरोप

By मुरलीधर भवार | Published: November 25, 2022 8:05 PM

कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या 65 बिल्डरांनी महापालिकडून परवानगी मिळविल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले.

कल्याण-अधिकृत बांधकाम करणा:या बिल्डरांना सर्व नियम कायदे पाळावे लागतात. मात्र बेकायदा बांधकाम करणा:या बिल्डरांना कुठलीही बंदी नसते. त्यामुळे अधिकृत बांधकाम करणा:या बिल्डरांची बदनामी आणि डोकेदुखी होते. रेला प्राधिकरणाला खोटी कागदपत्रे सादर करुन कल्याण डोंबिवलीतच नव्हे तर राज्यभरातून एक हजार बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र रेराकडून मिळविली असल्याचा गौप्यस्फोट कल्याण डोंबिवली क्रेडीया एमसीएचआयचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी केला आहे. 

कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या 65 बिल्डरांनी महापालिकडून परवानगी मिळविल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले. या प्रकरणी एसआयटी आणि ईडीकडून तपास सुरु आहे. हे प्रकरण उघडकीस आणणारे वास्तू विशारद संदीप पाटील यांच्या धाडसाचे एमसीएचआयने कौतूक केले आहे. मात्र या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु असल्याने कल्याण डोंबिवलीतील अधिकृत बांधकाम करणा:या बिल्डरांचीही बदनामी होत असल्याची बाब एमसीएचआयच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करण्यात आली. या प्रसंगी एमसीएचआयचे अध्यक्ष भरत छेडा, पदाधिकारी अरविंद वरक, विकास वीरकर, राहूल कदम, दिनेश मेहता, संजय पाटील, रोहित दीक्षित आणि सुनिल चव्हाण आदी उपस्थित होते. 

या पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष पाटील यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. पाटील यांनी सांगितले की, महापालिकेनी परवानगी नसताना खोटय़ा प्रमाणपत्रच्या आधारे रेराला बांधकाम नोंदणी करणा:याची शहानिशा रेरा प्राधिकरणाकडून होणो गरजेचे आहे. हे का झाले तर रेरा आणि महापालिका प्रशासन यांच्या समन्वय नसल्याने हे प्रकरण घडले. यात घर घेणारा समान्य माणूस भरडला जातोय. त्याची आर्थिक फसवणूक झाली आहे.  कारण बेकायदा बांधकामात घर घेणा:याची नोंदणी केली जात नाही. त्यांना टॅक्स लागवण्यापासून वीज आणि पाणी कनेक्शन घेण्यात अडचणी येतात. अधिकृत बांधकाम करणारे बिल्डर हे टॅक्स भरतात. विकास कर देतात. मात्र सरकारचा कोटय़ावधी रुपयांचा महसूल बेकायदा बांधकाम करणा:या बिल्डरांनी बुडविला आहे. 65 बिल्डर फसवणूक प्रकरणात अडकलेले बिल्डर हे एमसीएचआयशी संबंधीत नाहीत. मात्र, प्रकरणामुळे अधिकृत बिल्डरांचीच नव्हे तर कल्याण डोंबिवली शहराची बदनामी होत आहे. त्याचा फटका अधिकृत बांधकाम करणा:या बिल्डरांना बसला आहे. रेराकडून यापूर्वी अधिकृत बांधकाम करणाऱ्या  दहा दिवसात बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळत होते. आत्ता त्याला तीन ते पाच महिने लागत आहे. हे सगळे प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करण्यात यावी या करीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एमसीएचआयच्या वतीने लवकरच भेट घेतली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणMuncipal Corporationनगर पालिका