डोंबिवली : मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या मुलुंड, डोंबिवलीरेल्वेस्थानकांमध्ये पाऊल ठेवल्यावर तुम्हाला एखाद्या पंचतारांकित हॉटेलात पाऊल ठेवल्यासारखे वाटेल. संगमरवरी सजावट, प्रशस्त वास्तू, आकर्षक रोषणाई असा स्थानकांचा कायापालट करण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट एमयुटीपी फेज-३ए प्रकल्पांतर्गत १२० कोटी रुपये खर्च येणार आहे.
या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून डोंबिवली स्थानकाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. ११ कोटी रुपये खर्च करून इलेक्ट्रिक कामे, सिग्नल ॲण्ड टेलिकम्युनिकेशन सेवा सुधारण्यात येणार असल्याचे एमआरव्हीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी म्हणाले.
कामांसाठी लॉट्स सर्व स्थानकांच्या कामांसाठी लॉट्स ठरविण्यात आले असून मुलुंड, डोंबिवली हे दुसऱ्या लॉट्समध्ये आहेत. डोंबिवली स्थानकातील कामांचे थ्रीडी, डिजिटल डिझाइन उपलब्ध आहे.
डोंबिवली, मुलुंडच्या विकासकामांसाठी निविदा मंजूर झाली आहे. अंदाजे १२० कोटी रुपये खर्च करून स्थानकांचा वेगाने विकास होईल. त्यापाठोपाठ मध्य व पश्चिम रेल्वेवरील सुमारे १७ स्थानकांच्या विकासाचे पूर्ण नियोजन केले आहे. - सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी