शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

"स्नॅपचॅट वापरु नको"; वडिलांच्या बोलण्याचा राग आल्याने डोबिंवलीत मुलीने संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 2:06 PM

मोबाईलच्या वापराबाबत वडिलांनी दिलेला सल्ला न पटल्याने १६ वर्षीय मुलीने आपलं आयुष्य संपवलं.

Dombivli Crime : आजकाल तरुणांपासून जेष्ठापर्यंत अनेकजण हे मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या नादात अनेकजण असं काही पाऊल उचलतात ज्याचा कधी कोणीही विचार केला नसेल. असाच काहीसा प्रकार डोबिंवलीत घडला. सोशल मीडियाच्या वापरावरुन वडील ओरडल्याने एका अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेने डोबिंवलीत खळबळ उडाली आहे.

वडिलांनी मोबाईल फोनवर मेसेजिंग ॲप डाउनलोड करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने डोबिंवलीत १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती वडिलांनीच दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वडील ओरडल्याने राग अनावर झाल्याने मुलीने आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

स्नॅपचॅटच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने वडिलांना मुलीला ते ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करु नको असे सांगितले होते. त्यानंतरही वडिलांचे न ऐकता मुलीने मोबाईलमध्ये स्नॅपचॅट ॲप डाउनलोड केले. वडिलांना ही गोष्ट कळताच त्यांनी नाराजी दर्शवली आणि मुलीला असे पुन्हा करु नको असे सांगितले. वडिलांच्या बोलण्याचा राग आल्याने मुलीने बेडरुममध्ये रात्रीच्या दरम्यान ओढणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. त्यानंतर मृत मुलीच्या वडिलांनीच पोलीस ठाण्यात आत्महत्या केल्याची तक्रार दिली. मुलीने कथितरित्या रात्री तिच्या बेडरूमच्या छताला गळफास लावून घेतल्याचे म्हणत दुसऱ्या दिवशी कुटुंबाला तिचा मृत्यू झाल्याचे कळल्याचे म्हटलं.माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि अपघाती मृत्यूची नोंद केली.

कौटुंबिक वादातून महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी

दुसऱ्या एका घटनेत डोबिंवलीत कौटुंबिक वादातून महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला.  प्रीती उमा भारती असे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतलेल्या महिलेचे नाव आहे. इमारतीवरुन उडी मारल्याने महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस