कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी थकविणाऱ्या थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली होती. १५ जून ते १८ आ’गस्टपर्यंत या योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत १७५ कोटी रुपये जमा झाले आहेत. महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी मालमत्ता कराच्या थकबाकीदाराकरीता अभय योजना लागू केली होती. ही योजना १५ जून पासून लागू करण्यात आली. तिची मुदत ३१ जुलै पर्यंत होती.
या योजनाला मिळेला प्रतिसाद पाहता नागरीकांकरीता १८ आ’गस्ट पर्यंत मुदत वाढविण्यात आली. १८ आ’गस्टपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत अभय योजनेमुळे १७५ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे योजनेची मुदत पुन्हा वाढविण्यात आली आहे. या अभय योजनेचा लाभ आत्ता ३१आ’गस्ट पर्यंत घेता येणार आहे. आत्तापर्यंत ४० हजार ७५१ मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्या मालमत्ता धारकांची थकबाकी आहे. त्यांनी एकूण थकबाकी रक्कमेच्या २५ टक्के रक्कम एकरकमी भरल्यास ७५ टक्के व्याजाची आणि दंडाची रक्कम माफ करण्यात आली आहे.
याशिवाय चालू वर्षीच्या मालमत्ता कराची रक्कम एकरकमी भरल्यास मालमत्ताधारकास ५ टक्के सूट दिली जाईल. या सवलतीचा लाभही ३१ आ’गस्ट पर्यंत घेता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी अभय योजनेसह ५ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अभय योजनेची मुदत आत्ता १३ दिवसाकरीता वाढविण्यात आल्याने या १३ दिवसात आणखी किती थकबाकीदार या योजनाचा लाभ घेतात. तसेच महापालिकेचे तिजोरीत किती पैसा जमा होतो. हे पाहून पुन्हा प्रशासन या अभय योजनेला मुदतवाढ देऊ शकते.