शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

रेल्वे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ साेशल मीडियावर टाकून नोकरीचे आमिष दाखवित २१ लाखांना गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 7:38 AM

मेल, एक्स्प्रेसचे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ एकाने सोशल मीडियावर व्हायरल करून रेल्वेत नोकरी हवी असल्यास संपर्क साधा, असे आवाहन केले होते.

कल्याण :

मेल, एक्स्प्रेसचे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ एकाने सोशल मीडियावर व्हायरल करून रेल्वेत नोकरी हवी असल्यास संपर्क साधा, असे आवाहन केले होते. त्याला भुलून एकाने त्याच्या पत्नीला नोकरी लावण्यासाठी २१ लाख रुपये दिले. मात्र, नोकरी न देता फसवणूक करणारा भामटा उमाशंकर बर्मा (रा. मूळ उत्तर प्रदेश) याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

पूर्वेत राहणारे राजेंद्र जैन यांच्या पत्नीला नोकरीची आवश्यकता होती. सोशल मीडियाद्वारे जैन हे बर्मा याच्या संपर्कात आले. बर्मा याचा व्हिडीओ जैन यांनी पाहिला होता. त्याला प्रतिसाद देत जैन यांनी त्यांच्या पत्नीला नोकरी देण्यासाठी बर्मा याला २१ लाख रुपये दिले होते. मात्र, पैसे देऊनही पत्नीला नोकरी न मिळाल्याने जैन यांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. त्याला बर्मा प्रतिसाद देत नव्हता. 

अखेरीस जैन यांनी बर्माला नांदिवली येथील घरी बोलावून घेतले. तसेच तो येणार असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्यास दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी पोलीस अधिकारी हरिदास बोचरे आणि सुरेंद्र गवळी यांच्यावर कारवाईची जबाबदारी सोपविली. बर्मा हा जैन यांच्या घरी येताच पोलिसांनी त्याला अटक केली. बर्मा याला साथ देणारे आणखी दोन भामटे असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

व्हिडीओ बनवला कसा?१. बर्मा हा मोटारमन अथवा लोको पायलट नाही. मग त्याने मेल एक्स्प्रेसचे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ कसा बनविला? त्याला हा व्हिडीओ काढण्याची अनुमती रेल्वेच्या कोणत्या व्यक्तीने दिली? २. पोलिसांसमोर जैन हे फिर्यादी म्हणून पुढे आले असले तरी बर्मा याने अशा प्रकारे अन्य किती जणांना रेल्वेत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.