कल्याण - कल्याण लोकसभा मतदार संघात एकूण ३४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी चार जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३० पैकी दोन अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूकीच्या रिंगणात २८ उमेदवार आहेत. त्यपैकी खरी लढत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना अशी आहे.
उद्धव सेनेचे पदाधिकारी आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरेकर यांचा उमेदवारी अर्जात त्रूटी निघाल्यास पर्यायी उमेदवारी असावा यासाठी जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. दरेकर आणि जाधव या दोघांचे अर्ज वैध झाले होते. त्यामुळे जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याचबरोबर वंचित तर्फे जमीन खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली गेली नसल्याने त्यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा महायुतीतर्फे निवडणूकीच्या रिंगणात आहे.
त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे उद्धव सेनेच्या उमेदवार वैशाली देरकर या रिंगणात आहे. खरी लढत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना अशी होणार आहे. या मतदार संघात बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. बसपाचे प्रशांत इंगळे, राईट टु रिकॉल पार्टीचे अमित उपाध्याय, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अरुण निटूरे, अपनी प्रजाहित पार्टीचे प्रवीण गवळी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टीच्या पूनम बैसाणे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) चे श्रीकांत शिवाजी वंजारे, भीमसेनेचे श्रीधर साळवे, वंचित बहुजन आघाडीचे मोहम्मद शेख सुलेमानी ठाकूर, बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) च्या सुशिला कांबळे, संयुक्त भारत पक्षाचे संभाजी जाधव, राष्ट्रीय मराठा पार्टीचे हिंदूराव पाटील, अपक्ष उमेदवार अजय मोर्या, अमरीष मोरजकर, अरुण जाधव, अश्वीनी केंद्रे, नफिस अन्सारी, प्राजक्ता येवले, मोहम्मद खान, राकेश जैन, शिवा अय्यर, डॉ.सचिन पाटील, सलीमउद्दीन खान, हितेश जेसवानी, ज्ञानेश्वर लोखंडे हे रिंगणात आहेत.