डोंबिवली: महावितरणने तातडीच्या तत्वावर काम करण्याच्या उद्देशाने सोमवारी गणेश मंदिर फिडरवर देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ते काम सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत करण्यात येणार होते, तरीही अनेक ठिकाणी सव्वा पाच पर्यन्त लाईट न।आल्याने ३२९९ पैकी हजारो ग्राहकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार १२ रोहित्र दुरुस्त करण्यात आले, त्यात प्रामुख्याने ऑइल बदलण्यात आले. झाडी कटिंग १४ गाळे. केडीएमसी च्या मार्फत हायड्रोलिक गाडी बोलवून तसेच झाडे तोडणारे माणसे बोलवून अक्सिस बँक ते जोशी हायस्कूल पर्यंत पर्यंत लाईनला मध्ये येणारी सर्व झाडी कटिंग करण्यात आली. दोन रोहित्रामध्ये ऑइल भरले नाकेचा रोहित्रा तसेच केबी विरा हायस्कूल समोरील रोहित्रारामध्ये ऑइल भरण्यात आले, बाजीप्रभू समोरील रिंग मेन युनिट तसेच तारा पॅलेस समोरील रिंग मेन युनिट ची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली, संपूर्ण लाईनचे कट पॉईंट पुन्हा एकदा टाईट करण्यात आले आदी कामे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ट्रान्सफॉर्मर ऑइल भरले त्यामुळे ते मिक्स होण्यासाठी वेळ लागतो म्हणून थोडसं ते नोलोडवर ठेवलेला आहे थोड्या वेळात चालू होईल दोन रोहित्र वगळता दिलेल्या सर्व लाईन चालू झालेली होती, अन्य दोन ठिकाणी सव्वा पाच वाजे दरम्यान वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
आज इथे नसेल वीजपुरवठा मंगळवरी सकाळी १० ते दुपारी ३पर्यंत अति तातडीचे काम करीता आगरकर फीडर बंद राहणार आहे. त्या काळात आगरकर रोड, ब्राह्मण सभा, सर्वेश हॉल, ताई पिंगळे चौक, सावरकर रोड,नेहरू मैदान, नेहरू रोड, गडकरी पाथ, डाँ मुखर्जी रोड, फडके रोड, स्टेशन क्रॉस रोड व जवळ पास चा भाग इत्यादी ठिकाणी वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणने काहींना मोबाइल मेसेजद्वारे कळवले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"