अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण, डोंबिवलीसह महापालिका क्षेत्रातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याचे स्वागत होत असले तरीही महापालिका, आरटीओ, ट्रॅफीक पोलीस या तिन्ही यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून तीन वर्षांपूर्वी १८ मार्च २०१७ रोजी डोंबिवली शहरातील सुमारे ११३ पैकी ४९ रिक्षा थांबे हे वाहतुकीला बाधा आणत असून ते तातडीने बंद करावेत, असे संयुक्त अहवालात नमूद केले होते. परंतु, नेहमीप्रमाणेच हा अहवालदेखील धूळखात पडल्याने शहरांतर्गत कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे.रेल्वे स्थानक परिसरात पूर्व आणि पश्चिम दिशांना तर रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण मिळवणे हे वाहतूक पोलिसांच्या हाताबाहेर गेले आहे. रामनगर भागात पूर्वेकडील विविध भागातून येणाऱ्या रिक्षाचालकांमुळे वाहतूक पोलिसांच्या दालनासमोरच दिवस-रात्र कोंडी झालेली दिसून येते. त्या अहवालात पूर्वेला १८ आणि पश्चिमेला असलेले रिक्षाचे ३१ थांबे तातडीने बंद करावेत, असे म्हटले होते.त्यामध्ये चिमणी गल्ली, मदन ठाकरे थांबा, सरोवर बार गोग्रासवाडी, पाथरली गावठाण, मंजुनाथ स्कूल, जानकी हॉटेलनजीक, सावरकर पथ महादेव मंदिरजवळ, केळकर पथ वृंदावन हॉटेलजवळ, विवेकानंद सोसायटीसमोर, गावदेवी मंदिर चौक, शिव मंदिर चौक, स्नेहंकीत मित्रमंडळ चौक, कृष्णसुदामा थांबा, डीएनसी शाळेजवळ हुमाननगर थांबा, ओम बंगला आयरे पथ, स्वामी नारायण मंदिर, साईबाबा मंदिर आयरे पथ, राजगंगा थांबा आदींचा समावेश होता. पश्चिमेला अपूर्व हॉस्पिटल नजीक, म्हाळसाई रिक्षा थांबा, सखाराम थांबा, तुळशीराम जोशींच्या बंगल्याजवळ, श्रीराम मंदिर नं ३, नेमाडी गल्ली थांबा नं १, गिरिजामाता मंदिराजवळ, फुलेनगर रिक्षा थांबा, गावदेवी मंदिरा लागूनचा थांबा, गोपीनाथ चौकाच्या नाल्याजवळील, अनमोल नगरी, श्रीधर म्हात्रे चौक, गरिबाचा वाडा, नील कमळ बंगल्याजवळ, स्वामी शाळेसमोर फुले पथ, भरत भोईरनगर रिक्षा थांबा, महाराष्ट्रनगर अभिनंदन सोसायटीसमोर, योग संकुलासमोर, विजय सोसायटीनजीक, नवापाडा, करण बिल्डिंगजवळ, शंखेश्वर पाडा, जोंधळे मंदिराजवळ, महात्मा गांधी उद्याननजीक, जयहिंद कॉलनी गुप्ते पथ, रोकडे बिल्डिंग जवळ, ट्रान्झिट कॅम्पसमोर, त्रिभुवन सोसायटीसमोर, राजश्री बंगला, सम्राट चौक, लक्ष्मी डेअरी, फ्लेक्स जिमजवळ आदी रिक्षाथांब्यांचा समावेश आहे.
nपरिसरातील जागा अरुंद, रस्ते छोटे असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने बहुतांश थांबे बंद करावेत, अशा सूचना त्यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची अंमलबजावणी केली गेली नव्हती. आयुक्तांनी आवश्यक ते बदल करून वाहतुकीला शिस्त आणावी, अशी मागणी वाहतूककोंडीने त्रस्त प्रवासी करत आहेत.nशहरात ११३ थांबे असल्याची नोंद असून, त्यावेळच्या अंदाजानुसार पूर्वेला ३४ आणि पश्चिमेला २९ स्टॅण्ड असण्याची गरज होती, असेही नमूद केले होते. सध्या तर गल्लोगल्ली रिक्षा थांबे झाल्याचे निदर्शनास येत असून, हा आकडा ११३ हून अधिक असण्याची शक्यता प्रथमदर्शनी दिसून येत आहे.