मुंबई : लोकल तसेच बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांसाठी कल्याण जंक्शन हे महत्त्वाचे स्थानक. येथूनच उत्तर आणि दक्षिण भारताकडे जाणारे फाटे फुटतात. त्यामुळे आठ प्लॅटफॉर्म असलेले कल्याण स्थानक कायम गर्दीने फुललेले असते. अनेकदा मेल - एक्स्प्रेस गाड्यांमुळे लोकल अडकून पडतात. या सर्वांवर उतारा म्हणून बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांसाठी नवीन सहा प्लॅटफॉर्म बांधण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे लोकल वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. सध्या कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर मेल - एक्स्प्रेस गाड्या येतात. लांब पल्ल्याच्या या गाड्यांमुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होतो. नवीन सहा प्लॅटफॉर्म्सच्या निर्मितीमुळे लोकल गाड्यांसाठी हे दोन्ही फलाट १०० टक्के वापरता येणार आहेत. नव्या प्लॅटफॉर्म्सच्या उभारणीसाठी ८१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कल्याण स्थानकातील प्रवाशांच्या आणि मेल - एक्स्प्रेस गाड्यांचा ताण कमी करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र नवीन सहा फलाट बांधण्यात येणार असून, संपूर्ण प्लॅटफॉर्मना ५६,७०० चौरस मीटरचा डेक स्लॅब उभारण्यात येणार आहे.
...अशी असेल रचना किंमत- रु ८१२.९७ कोटी. प्रत्येकी ६२० मीटरचे ६ नवीन प्लॅटफॉर्म. ५६,७०० चौरस मीटरचा डेक गुड्स यार्डमध्ये रिसेप्शन आणि डिस्पॅच मार्गिका रेल्वे गाड्या परीक्षांसाठी दोन मार्गिका एक रोड ओव्हर ब्रिज पत्री पूल रोड ओव्हर ब्रिजला समांतर. विद्यमान प्लॅटफॉर्मना जोडणारे ३ नवीन फूट ओव्हर ब्रिज