कल्याण - कोकणासह महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. मात्र डोंबिवली मधील ७० वर्षाच्या आजीबाई पुरग्रस्त्यांच्या मदतीसाठी अन्नधान्याचे किट तयार करत असल्याचे डोंबिवली मध्ये समोर आले आहे. त्यामुळे इच्छाशक्तीच्या जोरावर या ७० वर्षाच्या आजींनी आपल्या वयाला मागे सारत सेवेला सर्वाधिक प्राधान्य दिलं आहे.या दोन्ही आजींचे तोंडभरून कौतुक मनसे आमदार राजू पाटील यांनी केले.
आजी आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असतात.सत्तरीतल्या आजींचा धाक देखील आम्हला असतो.तरुणांना लाजवेल अस काम त्यांनी केलं आहे असे पाटील यांनी सांगितले.
इच्छा शक्तीच्या जोरावर कोणतीही काम शक्य होतात हे डोंबिवली मधील ७० वयाच्या मनसेच्या आजीबाईंनी दाखवून दिलं आहे. डोंबिवली मधील टिळकनगर परिसरात राहणाऱ्या ज्योती खवसकर आणि गोग्रासवाडी मध्ये राहणाऱ्या उषा विष्णू वझे या डोंबिवली महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी आहेत. मनसे महिला पदाधिकारी खांद्याला खांदा लाऊन अन्नधान्याचे किट तयार करत आहेत.त्यामुळे डोंबिवली मधील महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या या ७० वर्षाच्या तरुणी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.ज्योती खवसकर या महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयात काम करत होत्या. ३० वर्ष शासकीय सेवा केल्या नंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करण्यास सुरुवात केली आहे.तर अशा वझे या पेशाने शिक्षिका होत्या.मनसे पक्षाच काम करण्याची इच्छा असल्याने त्यांनी मनसे पक्षाचं काम डोंबिवली मधून करण्यास सुरुवात केली आहे.
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदत करत आहे.मात्र अस असताना मदत नव्हे तर सेवा करत असल्याचं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना देखील डोंबिवली मध्ये आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. डोंबिवली महाराष्ट्र नवनिर्माण महिला अध्यक्ष मंदा सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सेनेकडून १५० पेक्षा अधिक अन्नधान्याचे किट तयार केले आहेत.त्यामध्ये अन्नधान्यासह विविध प्रकारचे साहित्य एकत्र करून पुरग्रस्त्यांच्या मदतीला देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना सज्ज झाल्या आहेत.तर शनिवार रात्री अन्नधान्याचे किटने भरलेला टेम्पो निघणार असून मनसे आठ महिला पदाधिकारी त्यांच्यासोबत जाणत आहेत आणि पूरग्रस्तांना मंदत करणार आहेत.सदर सामानाची पाहणी शनिवारी मनसेचे आमदार पाटील यांनी केली आणि किट कसे तयार करावेत याचा आदर्श महिलांकडून घ्यावा असे इतर पदाधिकाऱ्यांना सांगत महिलांना शाब्बासकी दिली.यावेळी सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
सत्तरीतल्या आजींचा धाक देखील असतो - मनसे आमदार राजू पाटीलडोंबिवली मधून पुरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे किट तयार केले जात आहेत.डोंबिवली महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना देखील आघाडीवर अश्या कालखंडात मनसेचे आमदार राजू पाटील हे डोंबिवली मधील मनसेच्या शाखांमध्ये जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करत होते.यावेळी सांम टिव्हीने प्रश्न विचारल्या नंतर त्यांच तोंडभरून कौतुक केलं आहे. आजी आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असतात.सत्तरीतल्या आजींचा धाक देखील आम्हला असतो. तरुणांना लाजवेल अस काम त्यांनी केलं आहे आणि त्यांच्यापासून स्फुर्ती घेऊन आता आमचं मुख्य सेल देखील सोमवारी अन्न धान्य पाठवणार आहे.महाराष्ट्रामधून महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडून हि पाहिल्यांदा मदत जात आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो अस मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अंगीतले आहे.