कल्याण-वीज वितरण कंपनीच्या खाजगीकरणास विरोध करण्यासाठी वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. समांतर हस्तांतरणाचा परवाना अदानीला कंपनीला देऊ नये या मागणीसाठी आज कल्याणच्या तेजश्री कार्यालयासमोर समितीशी संलग्न असलेले ९५ टक्के कर्मचारी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. ७२ तासाच्या या संपात माघार घेतली जाणार नाही असा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
कृती समितीचे पदाधिकारी सुरेश म्हस्के यांनी सांगितले की, वीज वितरण कंपनी अदानीला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. या खाजगीकरणास कामगारांचा तीव्र विरोध आहे. कल्याण परिमंडळ हे वीज वितरण कंपनीला उत्पन्न मिळवून देणारे परिमंडळ आहे. आत्ता शेतक:यांना दीड रुपये दराने वीज दिली जाते. अदानीला काम दिल्यास शेतक:याना साडे सहा रुपये दर मोजावा लागणार आहे. कामगारांची ही लढाई कामगारांची नसून वीज ग्राहकांकरीता आहे. अदानीला काम दिल्यास खाजगीकरण नफ्यात आणि सरकारी तोटय़ात अशी स्थिती निर्माण होणार आहे. या संपात संपूर्ण राज्यातील ३१ कामगार संघटनांचे कामगार सहभागी झाले असून आऊट सोर्सिगद्वारे काम करणा:या १२ कंत्रटी कामगारांच्या संघटनाही संपात उतरल्या आहेत. आप पक्षाने संपाला जाहिर पाठिंबा दिला आहे. संपाची नोटीस आधीच देण्यात आली होती. त्यानुसार हा राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
या संपामुळे शहापूर, मुरबाड आणि पालघर या भागात वीज पुरवठा खंडीत असल्याचे कामगार वर्गाकडून सांगण्यात आले.