डोंबिवली-
डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव ते माणकोली खाडी पूलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा पूल मे अखेर्पयत वाहतूकीसाठी खुला होणार आहे. हा पूल खुला झाल्यावर मोठा गाव परिसरात वाहतूक कोंडी होऊ शकते. ही वाहतूक कोंडी टाळण्याकरीता डी कन्जेक्शनचा प्लान तयार करण्यात आला असून त्याचे काम लवकर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.
आयुक्त दांगडे यांनी आज मोठा गाव परिसरात पाहणी दौरा केला. हा डी कन्जेक्शनचा प्लान कसा असावा त्यावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात. याची सूचना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केल्या होत्या. पाहणी दौ:या माजी नगसेवक म्हात्रे यांच्यासह सहाय्यक संचालक नगररचनाकार दीक्षा सावंत, शहर अभियंते अजरून अहिरे, सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते आदी उपस्थित होते.
आयुक्त दांगडे यांनी सांगितले की, सध्या डोंबिवली मोठा गाव फाटक हा रस्ता सुरु आहे तो पुढे माणकोली खाडी पूलाशी जोडला जाणार आहे. त्याचबरोबर रिंग रोडच्या तिसरा टप्पा हा मोठा गाव ते दुर्गाडी आहे. त्याची निविदा काढली आहे. त्याच्या कामाला एमएमआरडीकडून सुरुवात होणार आहे.या रिंग रोडच्या मागच्या बाजूस दीडशे मीटर अंडरपास आणि दिवा वसई रेल्वे मार्गाला कोपर्पयत समांतर रस्ता तसेच त्याठिकाणी असलेला अंडर पास ही दोन्ही कामे एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जाणार आहेत. ही कामे माणकोली खाडी पूल वाहतूकीसाठी खुला होण्यापूर्वी मार्गी लावण्यात यावी असे एमएमआरडीएला सांगण्यात आले आहे. रेल्वे उड्डाणपूलाही राज्य सरकारकडून निधी मिळणे अपेक्षितसध्या मोठा गाव येथे दिवा वसई मार्गावर रेल्वे फाटक आहे. त्याठिकाणी रेल्वे उड्डाण पूलाचे काम केले जाणार आहे. त्याकरीता १९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्या कामाकरीता रेल्वेच्या डेडीकेटेड फ्रेंट कॉरीडॉर प्रकल्प प्रमुखांनी ३० कोटी रुपये खर्चाची तयारी दर्शविली आहे. मात्र १६८ कोटी रुपयांचा निधी महापालिका उभारु शकत नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. हा निधी राज्य सरकार महापालिकेस उपलब्ध करुन देण्यास सकारात्मक असल्याचे आयुक्त दांगडे यांनी सांगितले.