कल्याण- शहरातील पश्चिमेतील राैनक सिटी इमारतीतील एका फ्लॅटला आज दुपारी आग लागल्याने या आगीत ६९ वर्षीय वृद्ध महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेचे नाव रचना काैशीक असे आहे. तिला उपचारासाठी नवी मुंबईतील एेराेली येथील बर्न रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आग विझवण्याकरीता अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या आगीत महिलेचा फ्लॅट जळून खाक झाला आहे.
राैनस सिटीच्या एका इमारतीली १४ व्या मजल्यावर आज आग लागली. ज्या घरात आग लागली. त्या घरात रचना काैशीक राहतात. त्या दुपारी घरी स्वयंपाक तयार करीत हाेता. त्यावेळी त्यांच्या कपड्याने पेट घेतला. त्यांच्या फ्लॅटमधून धूर येऊ लागला. बचावासाठी रचना यांनी आरडाआेरडा केला. त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना त्याठिकाणाहून बाहेर काढले. कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्या आगीत जास्त भाजल्या असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबईतील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रचना या इमारती भाड्याने राहतात. आगीच्या घटनेची माहिती नागरीकांनी अग्नीशमन दलास दिली.
अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रचना यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुन्हा त्यांच्या फ्लॅटमधून धूर येऊ लागला. त्यांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतला हाेता. ताे कपडा त्याच ठिकाणी राहिल्या असल्याने त्याठिकाणी पुन्हा आग लागली असल्याची शक्यता व्यक्त केली. या आगीत रचना यांचा फ्लॅट जळून खाक झाला आहे. त्यांच्या घरातील वस्तूंचे आगीत नुकसान झाले आहे. अग्नीशमन दलाची गाडी आग विझविण्यासाठी आली त्या गाडीचा पाईप हा फुटलेला हाेता. त्यामुळे गाडीच्या पाईपमधून आगीसाठी वापरण्यात येणारे पाणी आग विझविण्या आधीच वाया जात हाेते. हा प्रकार पाहून इमारतीतील नागरीकांनी संताप व्यक्त केला.