कल्याण-कल्याणमधील एका नामांकित बँकेला होम्स लोनच्या नावाखाली सहा कोटी ३० लाख १७ हजार रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या फसवणूक प्रकरणात एजंट, कजर्दार, कंपनी आणि बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखकडे देण्यात आला आहे.
एका एजंटने २६ जणांच्या नावे दोन कंपन्या स्थापन केल्याचे भासविले. या कंपन्यातील २६ अजर्दाराना होम्स लोन्स हवे असल्याचे भासविले. त्यासाठी त्यांनी बिल्डर हवे होते. त्यांनी बिल्डरांनाही सोबत घेतले. कर्जाची रक्कम मोठी असल्याने एका कंपनीला त्याचा अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले होते. या कंपनीने देखील संबंधितांशी संगणमत करुन तसा अहवाल तयार करण्यास त्यांना मदत केली. कजर्दारांना बँकेकडून सहा कोटी ३० लाख १७ हजार रुपयांचा कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र कजर्दारांकडून होम्स लोन्सचे हप्ते फेडले जात नसल्याने बँकेच्या लक्षात आले की, बँकेती फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बँक प्रशासनाच्या वतीने शरद बेदाडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणातील एजंट उमेश भाईप, कोरवी अॅग्रो कंपनीचे संचालक कोकरे, क्रॅक्स रिस्क मॅनेजकंपनीचे संचालक आणि कर्ज घेणारे २६ अजर्दार यांच्यासह सिद्धीविनायक, साईराज, साई सृष्टी आणि संस्कृती या चार बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज मंजूरासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्या आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यासाठी खोटा अहवाल तयार करण्याचे काम संगनमताने करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
१५ लाख रक्कमेपेक्षा जास्तीची फसवणूक असलेला गुन्हा तपासाकरीता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जातो. या गुन्ह्यातील फसवणुकीची एकूण रक्कम सहा कोटी ३० लाख १७ हजार रुपये असल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.