शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

पगार वेळेत न दिल्याने कचरा उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाईची टांगती तलवार

By मुरलीधर भवार | Published: October 14, 2023 11:27 PM

केडीएमसीची अंतिम कारवाई प्रस्तावित

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिली महापालिका हद्दीतील कचरा उचलण्यासाठी नेमण्यात आलेल्या ठेकादार कंपन्याकडून कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नाही. दिले जाणारे वेतन अपुरे आहे. किमान वेतन नाही. या प्रकरणी महापालिकेने कायदेशीर बाबी तपासून ठेकेदारकंपन्यांच्या विरोधात अंतिम कारवाई प्रस्तावित केली आहे अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे. तसेच ठेकेदार कंपन्यांना कामाचे बिल दिले जाते. त्या बिलाच्या रक्कमेतून काही रक्कम कपात करुन महापालिकेकडे जमा ठेवण्यात आलेली आहे. या कंपन्यांची नावे आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट आणि सेक्युअर वन सिक्युरीटी सर्व्हिसेस अशी आहेत.

महापालिकेच्या ब. क. जे आणि ड प्रभाग क्षेत्रातील येथे कचरा उचलण्याचे काम आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या ठेकेदार कंपनीला दिले आहे. इतर प्रभागात दैनंदिन स्वच्छता तसेच कचरा उचलण्याचे कामम सेक्युअर वन सिक्युरीटी सर्व्हिसेस या कंपनीला दिले आहे. महापालिकेने या दोन्ही ठेकेदार कंपन्यासोबत केलेल्या करारनाम्यानुसार ठेकेदार ज्या कामगारांकडून काम करुन घेतो. त्यांना वेळेत पगार दिला पाहिजे. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन आणि नियमानुसार देय भत्ते दिले पाहिजेत. महापालिका ठेकेदाराच्या कामाची बिले वेळेवर काढते. मात्र ठेकेदाराकडून कामगारांना वेळेत पगार दिला जात नाही. तसेच किमान वेतन कायद्यानुसार २४ हजार ५०० रुपये पगार प्रत्येक कामगाराला दिला पाहिजे. मात्र प्रत्येक कामगाराला १२ हजार रुपये पगार तोही वेळेवर मिळत नाही.

प्रत्येक कामगारांचे दर महिन्याला १२ हजार रुपयांची मलई कोण खाते असा प्रश्न मनसेच्या कामगार संघटनेसह मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यानी उपस्थित केला होता. मनसे कामगार संघटनचे पदाधिकारी राजेश उज्जैनकर यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ११ आ’क्टोबर रोजी कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. या पश्चात महापालिका प्रशासन खळबळून जागे झाले. महापालिकेने अतिम कारवाई प्रस्तावित केली असल्याने ठेकेदार कंपन्यांनी कामगारांना आत्तापर्यंत किमान वेतन कायद्यानुसार न दिलेल्या पगाराची वसूली होऊ शकते. अथवा महापालिका त्याच्या बिलातून कपात केलेली रक्कम कामगारांना वळती करु शकते. या दोन्ही शक्यता या कारवाईतून फलित झाल्या नाहीत तर ठेकदार कंपनीचे कंत्राट रद्द केले जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी महापालिकेने अ’न्थोनी वेस्ट ह’ण्डलिंग कंपनीला कचरा उचलण्याचा ठेका दिला हाेता. तो देखील वादग्रस्त ठरला होता. तो ठेका महापालिकेने रद्द केला होता. आत्ता कचरा उचलणाऱ््या दोन्ही ठेकेदार कंपन्या कामगाराना वेळेत पगार न देणे, किमान वेतन न देणे या कारणावरुन गोत्यात आल्या आहेत. महापालिका पुढील अंतिम कार्यवाही काय करते याकडे मनसेसह कामगारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण