शहरं
Join us  
Trending Stories
1
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
2
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
3
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
4
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
6
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
7
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
8
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
9
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
10
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
11
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
12
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
14
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
16
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
17
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
18
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
19
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
20
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 

कल्याण स्थानकात लोकलचा डबा घसरला, धिम्या मार्गावरील लोकलचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 3:16 PM

सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घसरलेला डबा रात्री उशिरा रुळावर आणण्यात आला. या घटनेमुळे धिम्या मार्गावरील लोकलचा खोळंबा झाला होता. 

डोंबिवली : कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणाऱ्या धिम्या लोकलचा शेवटचा डबा शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घसरला. कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घसरलेला डबा रात्री उशिरा रुळावर आणण्यात आला. या घटनेमुळे धिम्या मार्गावरील लोकलचा खोळंबा झाला होता. 

प्रवाशांमध्ये गोंधळ- कल्याण स्थानकातून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकलचा डबा घसरल्याने फलाटावर गोंधळ निर्माण झाला. प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. फलाट दोनवरील प्रवाशांनी फलाट क्रमांक चारकडे धाव घेतली. - तेथून त्यांनी गंतव्य ठिकाणाची लोकल पकडली. खडवली, आसनगाव, टिटवाळा दिशेकडून येणाऱ्या उपनगरीय गाड्यांचा या दुर्घटनेमुळे खोळंबा झाला होता. 

टॅग्स :localलोकलrailwayरेल्वे