शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
4
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
5
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
7
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
9
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
10
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
11
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
12
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
13
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
14
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
15
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
16
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
17
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
18
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
19
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
20
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...

माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे -  आप्पा परब 

By प्रशांत माने | Published: December 18, 2022 11:49 PM

परब यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डोंबिवली : कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले, तर उत्तरेकडून आलेले हिरवे कसे रोखावे हे राणी ताराबाई यांनी शिकवले. त्यामुळे नुसते जगण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व करुन जगा असे प्रतिपादन दुर्गसंशोधक लेखक बाळकृष्ण उर्फ आप्पा परब यांनी रविवारी डोंबिवलीत केले.

परब यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले कलामंदिरात पार पडलेल्या चतुरंगच्या 32 व्या रंगसंमेलनात परब यांना जीवनगौरव पुरस्काराने दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्याहस्ते गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी परबांच्या पत्नी अनुराधा या देखील उपस्थित होत्या.

परब पुढे म्हणाले शिवाजी महाराजांची दुरदृष्टी समजून घेण्यासाठी तुमचा दृष्टिकोन सुक्ष्मदर्शी असावा. पाठांतरात मोठी शक्ति आहे हे सांगताना त्यांनी मुलांना पाठांतराची सवय लावा हे त्यांनी अपार असावे पाठांतर... संधीतची असावा विचार असे सुभाषितद्वारे कवी भूषण यांचे शिवाजी महाराजांवरील काव्य आपल्या मुलांकडून पाठांतर करून घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला. स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते हे मनाशी ठरवून प्रपंच ठरविला पाहिजे याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.

तर इतक्या मोठ्या व्रतस्थव्यक्तीला आपल्या हस्ते पुरस्कार दिला गेला  हे आपले भाग्य असल्याचे सदानंद दाते यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मराठी संस्कृतीचा अभिमान टिकविण्याचे सर्वाधिक प्रयत्न याच शहरात झाल्याचे सांगत  डोंबिवली शहराचा गौरव केला.  प्रत्येकाकडे गुणाची एक खाण असल्याचे म्हणताना समृद्धीकडून सार्थकाकडे जाण्यासाठी समृद्ध समाज आणि सार्थक व्यक्ती निर्माण करण्याची प्रेरणा आप्पांच्या जीवनातून मिळत असल्याचे सांगत त्यांनी आप्पांच्या कार्याला वंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ समीरा गुजर यांनी केले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे