डाेंबिवली- लाभले आम्हास भाग्य बाेलताे मराठी हे सांगणारे कविवर्य सुरेश भट यांची १५ एप्रिल राेजी जयंती. त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून डाेंबिवली काव्य रसिक मंडळाच्या वतीने एक रात्र कवितेच्या या कार्यक्रमाचे आयाेजन सूर्यवंशम हाॅलमध्ये केले हाेते. रात्री दहा वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम चक्क सकाळी सात वाजेपर्यंत सुरु हाेता.
या कार्यक्रमास राज्यभरातील कानाकाेपऱ्यातून ४० ते ४५ जण उपस्थित हाेते.कवितेच्या एका रात्रीची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. अध्यक्ष सुप्रसिद्ध गजलकार अप्पा ठाकूर, सुप्रसिद्ध मालवणी कवयित्री सुनंदाताई कांबळे आणि छायाताई कोरेगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.विशाल राजगुरु यांनी
रुजवले बीज तू होतेस जे आत्म्यामधे माझ्याफुले त्याच्याच झाडाची तुला मी वाहतो आहे
ही गजल सादर केली. महेश देशपांडे यांनी गझलसम्राट सुरेश भट यांची एक रचना सादर केली.मग सुरू झाला एक रात्र कवितेचा लपंडाव हेमंत राजाराम यांच्या रचनेने नंतर कधी विनायक लळीत तर कधी कविता डॉट कॉम कवी जितेंद्र लाड तर कधी पार्कातल्या कवितेचे विजय उतेकर, स्वरूपाताई कधी अभिजीत दाते, कधी रवींद्र सोनावणे कधी मृणाल कधी आनंद पेंढारकर यांनी त्यांच्या रचना सादर केल्या. अप्पा ठाकूर यांनी त्यांची
आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे..मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहेआणि विठ्ठलाला गोड सूचना देत.. ..तूर्तास विठ्ठलाने आता असे करावेसोडून वीट मागे, थोडे पुढे सरावे.ही रचना सादर केली.
रात्रभर खोचत गेलास स्पर्शाचं एकएक मोरपीस माझ्या अंगोपांगावरआता रानातल्याही मोरांना माझा हेवा वाटू लागला. ही रचना छाया काेरगावकर यांनी सादर केली.सुनंदाताई कांबळे यांनी आपल्या विनोदी मालवणी ढंगाने सर्वांची हसवून साेडले. विशेष कविता डॉट कॉमचा छोटा शिलेदार प्रसाद माळी याच्यात माेठा कवि हाेण्याचा आत्मविश्वास दिसून आला.